स्वॅग माझ्या फाट्यावर ! आईच्या गावात बाराच्या भावात ! मती,रूमी, मॅगी या गर्ल्स येताहेत गाणी गात आपल्या भेटीस ! आपली आपल्याच आई वडीलांशी नव्याने ओळख निर्माण होणार काय ? तर २९ नोव्हेंबर ला भेटणार गर्ल्स ना !!!

२९ नोव्हेंबरला 'गर्ल्स' येताहेत भेटीला !
         'बॉईज' आणि 'बॉईज 2' या दोन्ही चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल सखाराम देवरुखकर आता घेऊन येत आहेत, मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची धमाकेदार सफर 'गर्ल्स'च्या रूपात.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि  कायरा कुमार क्रिएशन प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट तरुणींच्या एका अनोख्या जगाची सफर घडवणार आहे.
                मती, रुमी, मॅगी या तीन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या मुली त्यांचे दैनंदिन आयुष्य जगत असताना एका वळणावर जेव्हा त्या एकत्र येतात तेव्हा, त्या तिघींची एकमेकींशी होणारी ओळख, आयुष्याकडे बघण्याची नव्याने मिळालेली नजर, नवीन विचार, नातेसंबंध आणि मुख्य म्हणजे त्यांची होणारी घट्ट मैत्री. या गोष्टीवर भाष्य करणारा हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा आहे. 'दोस्तीत कधी मतलबी व्हायचे नसते, तर त्या दोस्तीचा मतलब शोधायचा असतो'. या संवादातूनच मैत्रीचा खरा अर्थ सांगणाऱ्या या चित्रपटातून माणसाच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा चित्रपट पाहून आपली आपल्याच आई वडिलांशी नव्याने ओळख होणार आहे.
      'गर्ल्स' चित्रपटातील आतापर्यंत दोन गाणी प्रदर्शित झाली आहे. 'आईच्या गावात' या मंदार चोळकर यांच्या हटके शब्दांना प्रफुल आणि स्वप्निल यांनी संगीतबद्ध केले असून वैशाली सामंत, कविता राम आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केले आहे. या उडत्या चालीच्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे. या सिनेमातील दुसरे गाणे म्हणजे 'स्वॅग माझ्या फाट्यावर'. वरून लिखाते यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून मुग्धा कऱ्हाडे आणि स्वप्नील गोडबोले यांनी या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. तर वरून लिखाते आणि मुग्धा कऱ्हाडेच्या रॅपने गाण्याची रंगत अधिकच वाढली आहे. 'स्वॅग माझ्या फाट्यावर' या जल्लोषमय गाण्याला प्रफुल -स्वप्नील यांचे संगीत लाभले आहे. आता लवकरच या चित्रपटातील  'छबीदार छबी' हे गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या 'गर्ल्स' चित्रपटात किती मजामस्ती करणार आहेत, याची झलक आपल्याला या दोन गाण्यातून पाहायला मिळत आहे.
     या चित्रपटात अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, देविका दफ्तरदार, पार्थ भालेराव, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्या व्यतिरिक्त अनेक कलाकार दिसणार आहेत.  प्रफुल आणि स्वप्निल यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून अमित भानुशाली यांनी असोसिएट प्रोड्युसर म्हणून काम पाहिले आहे. हा 'गर्ल्स' सिनेमा  येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !