येवला मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष विंचू, तालुका सहसरचिटणीस पदी पांडुरंग शेळके, कार्याध्यक्ष पदी सुनील गायकवाड यांची निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

येवला मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष विंचू, तालुका सहसरचिटणीस पदी पांडुरंग शेळके, कार्याध्यक्ष पदी सुनील गायकवाड यांची निवड !
येवला::- तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष विंचू, सहसरचिटणीसपदी येवला पांडुरंग शेळके, कार्याध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
     येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक (२०२० ते २०२२)निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा प्रतिनिधी लाला कुडके यांनी कामकाज पाहीले, जेष्ठ पत्रकार दत्ता महाले यांच्या सूचनेनुसार बिनविरोध निवडीसाठी पाच सदस्यांची समिती तयार करण्यात येऊन त्यांना सर्वाधिकार देण्यात आले त्यानुसार कार्यकारिणी निवडण्यात आली यात अध्यक्षपदी संतोष विंचू, सहसरचिटणीसपदी पांडुरंग शेळके पाटील यांची तर कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्षपदी लक्ष्मण घूगे, शिवाजी भालेराव, खजिनदारपदी कुमार गुजराथी, संघटकपदी मनोज पटेल, सहसरचिटणीस पदी संतोष घोडेराव, सहखजिनदार पदी सिताराम बैरागी, सहसंघटकपदी सुदर्शन खिल्लारे तर कार्यकारिणी सदस्यपदी शब्बीर इनामदार, प्रवीण खैरनार, मुकुंद अहिरे, राजेंद्र  परदेशी, रोहन वावधाने यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे, प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष राकेश गिरासे,  यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !