आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा चंग बांधला आहे का ? अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ! जिल्हा हिवताप अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महेंद्र बबनराव देवळीकर, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नाशिक, यांना १५,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक
नासिक::- यातील तक्रारदार यांचे सन-१९८६ ते १९९२ या कालावधीमधील एक वेतनवाढ कमी दिली गेल्याचे
तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीचे वेळी सन २०१३ मध्ये झालेल्या वेतन पडताळणीमध्ये निर्देशन
वेतन फरकाचे बील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नाशिक येथे मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी सादर
केले होते. सदर बील मंजुर करण्यासाठी आलोसे महेद्र बबनराव देवळीकर, जिल्हा हिवताप अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडे २०,०००/-रू.लाचेची मागणी केल्याने, तक्रारदार यानी आज दि.१६/१०/२०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिल्यामुळे सदर तक्रारीची ला.प्र.वि.नाशिक पथकाने सापळापुर्व पडताळणी केली असता पड़नाळणी दरम्यान आलोसे महेंद्र बबनराव देवळीकर यांनी तकारदार यांचेकडे २०,०००/-रू लाचेची मागणी करत त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १५,०००/-रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम जिल्हा हिंवताप अधिकारी कार्यालय नाशिक येथे स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी