हिटलरच्या पंख छाटलेल्या कोंबडी सारखी अवस्था करून घेऊ नका !!! मतदान करूया-सशक्त महाराष्ट्राला ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!;
चला मतदानाला चला;मतदान करा जरा समजून
"एकवीस तारीख" , सर्वांना मतदान टाकण्याचे वेध लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपल्याला समजावून सांगितले आहे की मी काय केले आणि काय करणार आहे. कोणी सांगितले की मी काय करणार आहे. सर्वच आश्वासनं......विश्वास तरी कोणावर ठेवायचा. आज पंधरा दिवसात लोकांनी पाहिलं की सारेच राजकीय पक्ष आपल्या दाराशी आले. कच-यावर बसले. त्यांना घाण वाटली नाही,आपणही त्यांना चांगले वाटलो. कितीही वाईट असलो तरी. आपल्याला लुभावण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपल्याला गरळ घातली.
आपल्याला राज्याचा विकास करायचा आहे. त्याचबरोबर आपलाही. केवळ राज्याचा विकास करुन चालणार नाही तर आपलेही हितसंबंध सरकारने जोपासले पाहिजे यासाठी आपल्याला मतदान करायचे. जर राज्याचा विकास होत असेल, पण आपला जर जीव जात असेल तर ते राज्य त्या हिटलरच्या कोंबडीसारखे होईल जी कोंबडी हिटलरने पाळली होती. एका कोंबडीचे चक्क त्याने पंखच उपडून टाकले होते. त्यानंतर तो त्यांना दाणे देत होता. आता या कोंबडीला जर कुत्रीम पंख लावले व श्रुंगार केला तरी तिला चिरतरुणता प्राप्त होईल काय? हिच अवस्था आपल्या राज्याची होईल ! राज्याचा विकास कोंबडीच्या श्रुंगारासारखा जरी असला तरी तिचे वास्तविक पंख नसल्याने तिची जी अवस्था होते तीच आपली अवस्था. म्हणूनआपणाला या मतदानात आपलाही विकास पाहायचा आहे. ह्याआपल्या विकासाबाबत विचार केवळ आजच्यापुरती एक पाव दारु मिळाली व पाचशे ची नोट मिळाली व आजची सांज भागली असा करायचा नाही. तर पाच वर्षाचा करायचा आहे.पाच वर्ष आपले उत्तम जावेत. कोणाला कोणताच त्रास होवू नये याबाबत आपण विचार करुनच मतदान करायचे आहे. याबाबत जो उमेदवार योग्य , त्यालाच मतदान करायचे आहे.
अलिकडे शेतकरी आत्महत्या करायला लागले आहेत. लोकं आरक्षण मागत सुटले आहेत. शिक्षकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आहेत, तेव्हा जो उमेदवार तुम्हाला याबाबत न्याय देवू शकत असेल. तुमचे प्रश्न सभागृहात मांडू शकत असतील, त्यालाच मतदान करायचे आहे. सरकार कोणाचीही का असेना. सरकारला थोडं ना माहीत तुमच्या स्थानिक पातळीवरील लोकांचे प्रश्न काय? ते प्रश्न विधानसभेतत मांडून तो मुद्दा उचलून धरणारा प्रतिनिधी आपल्याला हवाय. कारण काहीकाही तर प्रतिनिधी हे इकडे आपल्याकडे पोपटपंची बोलतात. पण विधानभवनातील सभागृहात मात्र त्यांची बोलती बंद होते. असा नेता नको. त्याची शहानिशा आपल्याला करायची आहे. काही मंडळी तर चक्क दारुने अख्ख कुटूंब उध्वस्त होत असतांना "जिल्ह्यात मी दारु दुकाने सुरु करणार" म्हणतो केवळ मतदान मिळावे व मी निवडून यावे यासाठी.
अलिकडे निवडणूकीत उमेदवार कोणते आश्वासन देईल हे काही सांगता येत नाही, तेव्हा आपण या सर्व गोष्टीचा विचा करुन आपल्याला आपले मतदान कोणाला द्यावे हे ठरवायचे आहे.त्यानुसारमतदान करायचे आहे.
आपण उद्या मतदान करणार आहोत.त्याचबरोबर आपले राज्य कोणा एका प्रतिनिधींच्या हातात देणार आहोत.त्यामुळे आपल्याला आज दिवसभर विचार करायचा आहे की कोण आपल्याकडे धावून येणार? कोण आपली मदत करणार? कोण आपला पालनहार ठरणार आणि कोण आपल्याला तारणार?
आम्ही केवळ उद्याला स्वप्नात राहून मतदान करु नये, तसेच आपल्या घराजवळचा व्यक्ती आपल्याला मतदान या या अमुक अमुक पक्षाला टाक असे जरी म्हणत असेल तरी त्यांचं ऐकून मतदान करु नका. तर तुम्हालाही स्वतःचं मत आहे. तुमचाही मेंदू शाबूत आहे. तुम्ही ही मतदानासाठी विचार करण्यासाठी सक्षम आहात. तेव्हा आपला विचार पक्का करा आणि योग्य उमेदवार निवडा.
आजची रात्र म्हणजे लोकं कतल ची रात्र समजतात. रात्रभर निवडणूक आचारसंहिता असली तरी गाड्या फिरत असतात. हा छुपा प्रचार असतो. मोठमोठे सेंटिग याच रात्री घडतात. कोणी आपल्या गाडीत नोटा घेवून फिरतात तर कोणी दारु. मतदारांना लाच देण्यासाठी. हिच वास्तविकता आहे. पण मित्रांनो एक सांगतो, तुमचं मत अनमोल आहे. त्याची किंमत करता येत नाही. एका एका मतानं उमेदवार पडतो हे लक्षात घ्या. म्हणून कितीही कोणी आपल्याला लाच देवू जरी करीत असेल. कोणी कितीही दारु जरी देण्याचा प्रयत्न करीत असेल. ते सर्व तुमच्या मतासमोर निष्फळ आहे. देतीलही ते पाचशे, हजार रुपये. कोणाचे तुमचेच ना. तुमच्याच भरवशावर कमविलेले. महत्वाचं म्हणजे मत विकू नका. तर विकास करणा-या व गरीबांचा वाली असणा-यांना मतदान करा. चला मतदानाला चला आणि मतदान करा.पण जरा समजून.

अंकुश शिंगाडे नागपूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा