ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांना तत्त्वता मान्य केल्याने राज्यातील बावीस हजार ग्रामसेवकांच्या प्रश्नांसंदर्भात सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाची सांगता ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनकडून प्रलंबित तसेच विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू होते, ग्रामसेवकांच्या मागण्यांना ठोस नाही मात्र तत्त्वता मान्य करण्यात आल्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुरू असलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले अशी माहिती ग्रामसेवक युनियन चे पदाधिकारी वाघचौरे यांनी दिली.
प्रामुख्याने मासिक प्रवास भत्ता १५००/- रुपये करणे, ग्रामसेवक कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अहर्तामध्ये बदल करणे
व पदोन्नतीच्या पदांमध्ये वाढीव
पदांचा समावेश करणे, या मागण्यां संदर्भात शासन सकारात्मक असल्याची चर्चा होऊन आज संघटनेमार्फत सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घेतले असून सुमारे २२ हजार ग्रामसेवक आजपासून कामावर हजर होत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा