वेडं मन तुझ्यासाठी, येईल, पोहचेल, ऐकशील,. न्यूज मसाला परीवाराकडून शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली !!!

"वेडं मन तुझ्यासाठी" चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक विजयकुमार घोटे यांचं दुःखद निधन !
न्यूज मसाला परीवाराचा हितचिंतक आज दि. ३० आॅगस्ट २०१९ रोजी आपणा सर्वांना दुरावला, त्यांस शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली !!!
विजू, तुला आई आणि वडील यांनी "विज्या" हि हाक मारली की नाही मला माहीत नाही, परंतु ते सोडून तुला मिळालेल्या आयुष्यात दुसऱ्या कुणी अशी हाक मारली नसेल, तुझा स्वभावच मुळी सडेतोड, परखड पण आदबशीर होता आणि आज अचानक तु आम्हा सर्वांना सोडून गेलास, अनेकांनी आज हक्काने व तुझ्या निघून जाण्याच्या दुःखाने  "विज्या" तुझं "वेडं मन तुझ्यासाठी" च राखून ठेवलं रे म्हणत बैलपोळ्याचा अमावस्येच्या दिवशी (जे तुला कधी पटत नव्हते) सर्वांचे "मन" खट्टू करुन गेलास !
          आदिवासी समाज तुझ्याकडे एक पत्रकार, यशस्वी छायाचित्रकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, भावी राजकीय नेता, समाजाचा आधारस्तंभ अशा भावनेने सतत पहात होता, तुझ्या संपर्कात आलेल्या अनेकांना तुझा बौद्धिक व सामाजिक  सहवास हवाहवासा वाटायचा, नव्या धागूर ता. दिंडोरी जि. नासिक येथून मुंबई दिल्ली पर्यंत चा लोकसंग्रह, बाॅलीवूडला चित्रपटाच्या माध्यमातून नवा विचार देण्याच्या प्रयत्नाचा अर्धवट प्रवास अनेकांना चटका लावून गेला असेल.
         विजू , पत्रकारीतेत आला तेव्हा तुझ्याकडे फक्त डोकं आणि त्याच्यातला मेंदू होता, जो सर्वांकडे असतो तसा, मात्र २००५ नंतर तु त्याचा वापर करून आजघडीला जेथे पोहचला तेथून थोड्या अंतरावर तुझं समाजासमोरील यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे स्थान निश्र्चित होणार होते, फक्त काही महिने लागणार होते व पुढे तुला कधीच मागे वळून पहायची आवश्यकता नव्हती, पाठीमागे मोठा "कारवा" तयार होत होता अन् ऐन भरात आलेलं तुच नांव दिलेलं "वेडं मन तुझ्यासाठी" म्हणजे कुणासाठी ? नियतीशी जवळीकता साधन्यासाठी ? चित्रपट प्रदर्शनापूर्वीच तू तुझ्या शब्दांचा अर्थ आम्हाला शोधायला लावलास ?
विजू, तुला आधीच माहिती होते की आम्हाला फसविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सांगत होतास "वेडं मन तुझ्यासाठी" !!
विजू, ज्या "सेन्सार" ला दादा कोंडके यांनी आपल्या तालावर नाचायला लावले त्यांच्यानंतर "सेन्सार" ला नाचायला लावणारा फक्त "विजयकुमार घोटे" च ठरणार होतास, पण हे सर्व कदाचित उद्या "सेन्सार" मान्य करेल ही मात्र तू नाहीस, ते बघायला अन् थिएटरचा पडदा बाजूला सरेल, प्रेक्षक आवाज देतील "वेडं मन तुझ्यासाठी" मात्र हा आवाज तुझ्यापर्यंत येईल ! पोहचेल ! ऐकशील !!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !