सांगली पूरग्रस्त गावांची छावा क्रांतीवीर सेनेकडून पाहणी ! संभाजीराजेंकडून करण गायकर व छावा क्रांतीवीर संघटनेचे कौतुक !! भीषणता-मुख्य रस्त्यापासून २५० मीटर वाहून जातो कंटेनर !!! नाईलाज-फेकून दिले पाण्यात भिजून सडलेले धान्य !!! शक्यता-आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार !!!! मदत-प्रशासनाच्या जोडीला स्वच्छतादूत व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यायला हवे !!!!! बघायला हवेत छायाचित्र- न्यूज मसालाच्या नजरेतून, संपादक नरेंद्र पाटील, नासिक !!!!! छायाचित्र बघण्यासाठी व सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!!!

सांगली::- छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी काल सांगली जिल्ह्यातील आठ-दहा गावातील नागरिकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या समस्या समजून घेत आणखी काय मदत करता येईल हे समजून घेत तशी कार्यवाही करण्यात येईल असा विश्वास पूरग्रस्त भागातील लोकांना दिला.
         गायकरांसोबत या दौऱ्यात मी, (नरेंद्र पाटील संपादक-न्यूज मसाला, नासिक ) माझ्या नजरेतून पूरग्रस्त भागातील जे चित्र पाहीले ते मन पिळवटून टाकणारे आहे, याचा छायाचित्र रूपाने आपल्याला बोध होईलच.
          छावा क्रांतीवीर सेनेच्या कार्यकर्त्यांनी दि. १३ आॅगस्ट रोजी चर्चा केली व तत्काळ निर्णय घेउन दि. १४ आॅगस्ट रोजी रात्री कोल्हापूर-सांगलीकडे मदतीचा ट्रक रवाना केला.असा २४ तासात झटपट निर्णय घेऊन योग्य ती मदत कोल्हापूर येथील सैनिक हाॅल मध्ये पोहोचविला याबाबत स्वता खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी आपल्या शब्दांनी गायकर व छावा संघटनेचे कौतुक केले.
         सांगली जिल्ह्यातील जुनी धामणी, सांगली शहर, धामणी रोड, पदमाळे, दिग्रज अशा गावांना भेट दिली. जुनी धामणी येथील संपूर्ण गाव पाण्यात बुडाले होते, आज गावात पाणी नाही मात्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, घरांमधील सर्व सामान नागरिकांनी रस्त्यावर आणून ठेवले आहे, प्रशासनाला उचलण्यास सोयीचे व्हावे पण ""आभाळच फाटलं तिथं कुठे कुठे ठिगळ लावायचे" अशी परिस्थिती प्रशासनावर आली आहे. गाद्या, खाद्यपदार्थ, कपडे, साठवून ठेवलेले अन्नधान्य, फर्निचर, यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून आरोग्याचा प्रश्न गंभीर स्थिती निर्माण करू शकतो यासाठी आता स्वच्छातादूत व आरोग्य कर्मचारी यांची जबाबदारी वाढली आहे, करण गायकर यांनी त्याबाबत उपस्थित आरोग्य सेवकांशी चर्चा केली, आपल्याला काही अडचणी असतील तर मंत्रीमहोदय यांच्याशी संपर्क साधून मी सोडविण्याचा प्रयत्न करतो मात्र कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता काम करा, आपल्या सेवेची आज खरी गरज त्यांना आहे अशा विनम्र सूचना भेटी दिलेल्या गावातील प्रशासकीय यंत्रणेच्या देवदूतांना दिल्यात. (सर्वांची काळजी घेणे विसरून परक्या गावात सेवा देत आहेत, आज सदर गावांसाठी ते देवदूतच आहेत). यावेळी ग्रामस्थासह सर्वांचेच चेहरे भावविवशतेची भावना आजही लपवू शकले नाहीत यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. या पार्श्वभूमीवर छावा क्रांतीवीर सेनेकडून आणखी काय मदत करता येईल याचा विचार करून ती लवकरच पोहचविण्यासाठी नियोजन करून पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले.
           पदमाळे ता.जि.सांगली येथील पडलेल्या घरांसाठी शासनस्तरावरून मदत मिळणार आहे असे जाहीर झालेले आहे , त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न केले जातील, प्रस्ताव कसा सादर करावा याबाबत गायकर यांनी मार्गदर्शन केले व सर्वतोपरी मदत छावा क्रांतीवीर सेनेकडून करण्यात येईल, यासाठी चे पदाधिकारी व त्यांचे संपर्क क्रमांक संबंधितांना देण्यात आले.
          या मदत व पाहणी दौऱ्यात छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या सोबत, साप्ताहिक न्यूज मसाला (नासिक) चे संपादक नरेंद्र पाटील, नवनाथ शिंदे, नितीन शिंदे, विजय खर्जुल, हरीभाऊ बोडके, धनराज लटके, गणेश माने, दादासाहेब शिंदे, हनुमंत घाडगे, अमोल जगळे, मिलिंद चिटणीस, दिपक मुळीक, समाधान  सुुुरावशे, नितीन शिंदे,   विवेक पवार, पांडुरंग मोरे, जुबेेेदा शेख,  प्रिती काळे, संतोष लक्ष्मण कोळी, संतोष अंकुश कोळी, मनिषा शिंदे, नितुताई चव्हाण, गणेश शेजवळ, रवी भांबरगे, व छावा संघटनेचे कार्यकर्त्ये सहभागी झाले होते.
************************
************************
छावा क़ांतीवीर सेनेच्या सोबत मी (संपादक-न्यूज मसाला, नासिक) माझ्या नजरेतून पूरग्रस्त भागातील पाहीलेले वास्तव छायाचित्राच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करीत आहे. प्रत्येक संकट काहीतरी नवीन संकट मानवासमोर निर्माण करतं, मात्र या संकटात बळींची संख्या कमी असेल तरीही आरोग्याची समस्या मात्र गंभीर स्वरूप धारण करू शकते यांसाठी प्रशासनाकडून कार्यवाही होतच राहील फक्त त्यांना आता समाजसेवकांची साथ मिळाली तर जनजीवन सुरळीत व्हायला वेळ लागणार नाही असे वाटते.
***********************
सांगली तालुक्यातील जुनी धामणी येथील आजची (दि. १५ आॅगस्ट २०१९) परिस्थिती, आजही भयानक आहे, पूर्ण पुणे मदत पोहचलेली नाही, प्रशासनाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, मुख्य रस्त्यापासून दोन किमी अंतरावर असलेले हे २८० कुटुंबाचं जुनी धामणी गांव, जेव्हा मुख्य रस्त्यावर ५ ते ७ फुटांपर्यंत पाणी असल्याने या गावात प्रशासन पोहचणे अवघडच आहे, तरीही वल्हवाने (छोटी होडी) स्थानिक तरूणांनी बाया-माणसे-मुलेच नव्हे तर एकही पाळीव प्राणी पुराच्या तडाख्यात बळी पडू दिला नाही, न्यूज मसाला संपादक नरेंद्र पाटील यांनी तेथील नागरीकांशी चर्चा केली, मनोमन  सलाम त्यांच्या जिद्दीला दिला ! 
         प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे मात्र प्रशासन कडून इतक्या मोठ्या आपत्तीला तोंड देताना तुमच्या आमच्या प्रयत्नांची जोड मिळाली तर पुढील उद्भवणारे प्रश्र्न सुटण्यास मदत होईल. आजही त्यांना पिण्याचे पाणी, आरोग्य, कपडे व टिकाऊ अन्नपदार्थांची नितांत गरज आहे, ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या बांधवांच्या  मनातील भीती घालवण्यासाठी पुढे यायला हवे, फक्त खरी गरज ज्यांना आहे त्यांच्यापर्यंतच पोहोचवावी. जसे की जुनी धामणी, ता.जि. सांगली, पदमाळे ता.जि.सांगली .
        आज आठ ते दहा गावांना भेट दिली, मात्र दोन गावे माझ्या नजरेतून पाहीलेत, त्यांना लवकर आधार दिला तर तेथील गावकऱ्यांचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी जास्त काळ लागणार नाही.
*************************






























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !