द हंग्री' मराठी चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ! मराठीतील अनकट वनटेक सलग ४ तास २ मिनिट ५३ सेकंद चित्रपट !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल न्यूज मसाला, संपादक नरेंद्र पाटील, !!!!

'द हंग्री' मराठी चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये !
-  'द हंग्री' चित्रपट मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी पात्र ठरला आहे. मराठी चित्रपट सृष्टीत अशा प्रकारच्या चित्रपटाचा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे.
'द हंग्री' हा मराठी भाषेत तयार होणारा हा चित्रपट ४ तास ०२ मिनिट ५३ सेकंद अनकट वनटेक चित्रपट आहे. अशा मोठया चित्रपटाचे तो हि अनकट म्हणजे वन टेक असणाऱ्या प्रीमियर-शो झाल्यानंतर याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये करण्यात आली. संतोष राऊत व नितीन चव्हाण  दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ०६ जानेवारी २०१९ रोजी पुणे येथे चित्रित करण्यात आला आहे.या प्रसंगी गिनीज रेकॉर्डचे प्रतिनिधीं उपस्थित होते. मराठी भाषेतील जगातील पहिला अनकट वनशॉट, सर्वात मोठ्या लांबीचा चित्रपट ठरला. हा चित्रपट भारतीय सिनेमातील एक अनोखा प्रयत्न होता, जो मराठी सिनेमाला नवीन उंचीवर घेऊन गेला असेच म्हणावे लागेल. या चित्रपटाचे मयुरेश जोशी (डी.ओ.पी.) यांनी चित्रीकरण केले आहे. तांत्रिक दिग्दर्शन अभीर कुलकर्णी तर संगीत ओमकार केळकर यांचे लाभले आहे, या चित्रपटात सिजेश्वर झाडबुके व सुरेश विश्वकर्मा, गौरी काँगे हे प्रमुख भूमकेत आहेत. विनोद खेडकर, नीता दोंदे, राहुल बेलापूरकर, आशुतोष पाडेकर आदी ६९ कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. चित्रपटाला दादासाहेब फाळके गोल्डन कमेरा अवार्ड २०१९ साली ९ नामांकने  मिळाली आहेत. या अनोख्या विश्व-विक्रमाच्या प्रीमियर शो-साठी सौ.मुक्ताताई टिळक (महापौर पुणे ) मेघराजराजे भोसले, अध्यक्ष ,आखिल भारतीय मराठी
चित्रपट महामंडळ.  उज्वल निरगुडकर (ऑस्कर कमेटी मेंबर, इंडिया), अमोल पालेकर (कलाकार,
दिग्दर्शक) आदी मान्यवर व कलाकारांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन संतोष रामदास राऊत, नितीन चहाण, अनिरुद्ध मधुकर हळंदे यांनी केले होते.
          अशा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 'द हंग्री' चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला व यांतून कुण्या तरुणाने कुठल्याही क्षेत्रात विक्रमी कामगिरी करण्याची प्रेरणा घेतल्यास हा चित्रपट यशस्वी ठरला अशी भावना दिग्दर्शक संतोष राऊत व  नितीन चव्हाण यांनी व्यक्त केली.
         'द हंग्री' चित्रपटाचे चे सलग ४ तास २ मिनीटे ५३ सेकंदाचे चित्रीकरण करणारे मयुरेश जोशी यांचीही वैयक्तिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. त्यांचा सत्कार चित्रपटाच्या प्रिमियर शो प्रसंगी करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !