लवकरच राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी होणार, पत्रकार सुरक्षा समितीला उपसंचालक यांचे पत्र ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
लवकरच राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी होणार, पत्रकार सुरक्षा समितीला उपसंचालक यांचे पत्र !
राज्य सरकार व केंद्र सरकार केवळ अधिस्वीकृती पत्रिका धारक असलेल्या पत्रकारांना अधिकृत पत्रकार समजते व तशी शासन दरबारी नोंदणी केलेली असते अश्या अधिस्वीकृती असलेल्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ मिळतो इतर पत्रकारांना लाभ मिळत नाही हे सरकारचे धोरण चुकीचे असून इतर हजारो पत्रकारांवर अन्याय होत असून महाराष्ट्र मध्ये शहरी व ग्रामीण भागातील हजारो पत्रकार जीवावर जीवघेणी जोखीम पत्करून अल्प मानधनावर विविध चॅनल्स ,दैनिके, सप्ताहिके युट्यूब चॅनल वेब पोर्टल, पाक्षिक, मासिके मध्ये काम करत आहेत त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या जाचक अटी मुळे अधिस्वीकृती पत्रिका मिळत नसल्याने त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार पत्रकार म्हणून मान्यता देत नसल्याने अश्या गरीब वंचित पत्रकारांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही ही बाब लक्षात घेऊन पत्रकार सुरक्षा समितीची राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी करावी व त्यांना पत्रकारांसाठी असलेली योजना मध्ये समावेश करावा म्हणून गेली अनेक वर्षांपासून आंदोलने उपोषणे निवेदने सरकार दरबारी सादर करून पत्रकारांची नोंदणी बाबत नेहमीच जागल्याची भूमिका पार पाडत आहे राज्य सरकार व केंद सरकार केवळ अधिस्वीकृती असलेल्या लोकांना पत्रकार समजते मग इतर माध्यमात काम करणारे पत्रकार हे पत्रकार नाहीत का? असा प्रश्न पत्रकार सुरक्षा समितीने उपस्थित करून राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी करणे बाबत नेहमीच आग्रह धरला आहे दिनांक १३ मे २०१९ रोजी पत्रकार सुरक्षा समितीने माहिती व जनसंपर्क संचालनालय मंत्रालय मुबंई यांना पत्रकार नोंदणी बाबत पत्र सादर करण्यात आले होते याची दखल घेऊन उपसंचालक वृत्त यांनी राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी विषयक लवकरच आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे पत्रकार सुरक्षा समितीला पत्राद्वारे कळवले आहे.
साभार::- पत्रकार बांधवांसाठी
बरोबर ही मागणी मान्य व्हायला च हवी
उत्तर द्याहटवाBrobr hi magni yogya aahe
हटवाBrobr hi magni yogya aahe
हटवा