८ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन ! १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जवळच्या शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्या देण्यात येणार !! मोहीमेचा फायदा घेण्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांचे आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!


           नासिक::- जिल्हा परिषद आरोग्य विभागा व महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, यांच्या सहभागाने येत्या ८ ऑगस्ट  रोजी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व नगरपालिका क्षेत्रात सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळा या ठिकाणी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना जवळच्या शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २८% मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवीजंतां पासून धोका आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन करण्यात येते, या दिवशी १ते १९ वर्षे वयोगटातील तील सर्व मुला-मुलींना जवळच्या सरकारी शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येते  तसेच या मोहिमे पासून वंचित राहिलेल्या मुलांना दिनांक १६ ऑगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे, यामध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात १ ते २ वयोगटातील ५,१२,०४३ लाभार्थी बालके असून व २ ते १९ वयोगटातील ११,६७,००७ लाभार्थी बालके आहेत, एकूण १२,१८,२५० बालकांना त्याचा लाभ दिला जाणार आहे .या कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे  २९ जुलै रोजी समन्वय सभा घेण्यात आली, तसेच जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर वैद्यकीय अधिकारी,  शालेय विभागाचे केंद्रप्रमुख, एकात्मिक बाल विकास अधिकारी, यांचे दिनांक २४ जुलै रोजी एक दिवसाचे जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले बालकांमध्ये होणाऱ्या कृमीदोष, रक्तक्षय हे कुपोषणाचे मुख्य कारण आहे, त्यामुळे बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते तसेच ५६% मुलींमध्ये आणी ३०% किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो
               नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे मातीतून पसरणाऱ्या कृमी दोषाचे प्रमाण २९% आढळले आहे, त्यानुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा राबविला जातो, या मोहिमेचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज दि. मांढरे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .दावल साळवे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .सुरेश जगदाळे , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे , जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रवींद्र चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार ,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शैलेश निकम ,यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !