पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची औषध फवारणी व धूर फवारणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!
पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची औषध फवारणी व धूर फवारणी !
नाशिक (दि.१०) –सराफ बाजार, भांडी बाजार, फुल बाजार, तीळभांडेश्वर लेन व दही पूल यासारख्या पूरग्रस्त भागात साचलेला गाळ व कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील कार्यकर्त्यांनी औषध व धूर फवारणी केली. औषध व धूर फवारणीची सुरवात रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती येथून करण्यात आली.
गोदावरी नदीला आलेला आलेला महापुर ओसरल्यानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. परंतु गोदावरी नदीच्या महापुराचे पाणी सराफ बाजार, भांडी बाजार, फुल बाजार, तीळभांडेश्वर लेन व दही पूल परिसरात शिरल्याने संपूर्ण परिसर पुराच्या पाण्यात होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा साचल्याने रोगराई होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुरातील पाण्यामुळे आलेला गाळ व कचऱ्याच्या साम्राज्यामुळे साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये याकरिता राष्ट्रवादी पक्षाकडून औषध, धूर फवारणी करण्यात आली आहे.
औषध फवारणी व धूर फवारणी करताना पूरग्रस्त भागातील व्यापारी, दुकानदार व रहिवाश्यांनी पुरात झालेले नुकसान व विविध समस्यांचा पाढा शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या समोर मांडला. पूरग्रस्तांची समस्या शासन दरबारी मांडणार असून त्यांना लवकरात लवकर शासन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असे शहराध्यक्ष रंजन ठाकरे पूरग्रस्तांना म्हणाले.
याप्रसंगी प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, गटनेते गजानन शेलार, शहर सरचिटणीस संजय खैरनार, धनंजय निकाळे, अॅड.चिन्मय गाढे, नगरसेविका समीना मेमन, सुरेखा निमसे, बाळासाहेब गीते, नंदन भास्करे, राहुल शेलार, अनिल परदेशी, आबा आमले, योगेश दिवे, शंकर मोकळ, कुणाल बोरसे, जीवन रायते, ज्ञानेश्वर पवार, इम्रान पठाण, नदीम शेख, गणेश पेलमहाले, प्रतिक अहिरे, मोतीराम पिंगळे, अशोक धोत्रे, नामदेव गाडेकर, सचिन जाधव, दीपक शिंदे, सुशांत चव्हाण, दत्तू वामन, पंकज भामरे, विलास दोभाडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा