आझाद मैदानावर उद्या आंदोलन ! निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी आश्र्वासनपूर्ती करण्यात यावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

      नासिक::-महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक  संघटना (आयटक), महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने  "आशा" च्या प्रलंबित मागण्यासाठी दिनांक २० आॉगस्ट २०१९ मंगळवार पासून मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन चे हत्यार उपसले आहे. अशी माहिती काॅम्रेड राजु देसले यांनी दिली. निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी आशा व गट प्रवर्तक मानधन वाढीचे दिलेले आश्वासन पूर्ण करा. आन्द्रप्रदेश सरकारने दरमहा १० हजार रुपये मानधन सुरु केले आहे, मात्र महाराष्ट्र सरकार १ रु हि देत नाही. याबाबत‌ राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आयटक संलग्न सर्व आशा जिल्हा संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी केले आहे.
             तसेच राज्य सरचिटणीस सुमन पुजारी, राज्य उपाध्यक्ष विनोद झोडगे, दिलीप उटाने, शंकर पुजारी, उपाध्यक्ष वैशाली खंदारे, अॅड. सुधीर टोकेकर, राज्य उपाध्यक्ष दिवाकर नागपुरे, शालुबाई कूथे, उपाध्यक्ष अमृत महाजन, मुगाजी बुरुड सुवर्णा मेटकर, माया घोलप, सुमन बागुल, सुरेखा खैरनार अर्चना गडाख, सुनीता गांगुर्डे, विजय दराडे आदींनी नाशिक जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !