आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर !
ञ्यंबकेश्वर::-तालुक्यातील वाढोली येथील आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने गळक्या छतातून जलधारा येत असल्याने उपकेंद्रात पाणी साचले आहे, यामुळे रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपकेंद्र दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाठवुन ही उपकेंद्राला दुरूस्ती निधी प्राप्त होत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहे.
वाढोली येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत होऊन पंधरा वर्षा पेक्षा अधिक काळ झाल्याने त्यावेळी बसवलेले पत्रे जीर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने उपकेंद्रात पावसाचे पाणी येत असून उपकेंद्र सोय नसुन खोळंबा झाला आहे.त्यामुळे येथील आरोग्य सेविका व कर्मचारी यांना रूग्नांना उपचार कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. तर गावात मोठ्या प्रमाणात सर्दी,खोकला,ताप यांचे रूग्ण आहेत. त्यांना खाजगी दवाखान्याचा उपचार घ्यावा लागत असल्याने लाखो रुपयांचे उपकेंद्र बिनकामाची वास्तू होऊ पाहते आहे. उपकेंद्र दुरुस्तीची मागणी यापूर्वी येथील कर्मचारी यांच्याकडून वारंवार करण्यात आली याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.
******************************************
******************************************
दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत धुळ खात पडुन !
गत चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ञ्यंबकेश्वर तालुक्यातील दुरूस्ती योग्य आरोग्य उपकेद्राचा अहवाल सुट्टीच्या दिवशी कर्मचारी व आरोग्य अधिकारी यांना पंचायत समितीमध्ये बसुन मागवून घेतला त्यात वाढोली येथील उपकेंद्राची दुरूस्ती करण्याचा अहवाल सादर केला असतांना कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होऊ न शकल्याने गावातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आला आहे.
************************************
-एका आरोग्य कर्मचाऱ्याची प्रतिक्रीया !
आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती साठी अहवाल पाठवा आहे. उपकेंद्रात पत्रे तुटले असल्याने पाणी आत येते त्यामुळे रूग्णांना उपचार देतांना अडचणी होत आहेत.लवकरात लवकर पत्रे बदलणे आवश्यक आहे.
****************************************.
पावसाचे पाणी उपकेंद्रात आल्याने आरोग्य सेविका पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर रूगणांकडे लक्ष कशा देतील हा प्रश्र्न उपस्थित होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा