कामगार चळवळ एकजूट करण्याचा निर्धार- अमर जित कौर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल- संपादक नरेंद्र पाटील !!!!!
आयटक च्या शताब्दी वर्षात कामगार चळवळ एकजूट करण्याचा निर्धार- अमर जित कौर
मुंबई: ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) भारतातील पहिली कामगार संघटना आयटक ची स्थापना मुंबई येथे ३१ ऑक्टोबर १९२० रोजी तत्कालीन न्यू एम्पायर थिएटर व्ही.टी. जवळ झाली. लोकमान्य टिळक हे नियोजित अद्यक्ष होते मात्र ते दिवंगत झाल्या मुळे लाला लजपतराय पहिले अद्यक्ष झाले. त्यांनी पहिल्या स्थापना अधिवेशनात भारताला संपूर्ण स्वातंत्र्या ची मागणी केली. कामगारांनी स्वताच्या विकासासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. देशभरातील वेगवेगळ्या विचाराचे लोक कामगार एकत्र येत होते. देशातील सार्वजनिक उद्योग उभारण्यासाठी कामगार चळवळीचे योगदान तेव्हापासून आजतागायत आहे. एम्पाइज कॉम्पेजेशन ऍक्ट १९२३ कायदा, ट्रेड युनियन ऍक्ट १९२६, पेमेंट वेजेस ऍक्ट १९३६, इंडट्रीयल डिस्फुट ऍक्ट १९४७, फॅक्टरी ऍक्ट १९४८, पेमेंट बोनस ऍक्ट १९६५, महागाई भत्ता कायदा १९३४, करण्यासाठी आयटक चे योगदान आहे. आज हे कामगार चळवळीने मिळविलेले कायदे मोडून काढले जात आहेत. यामुळे आज पुन्हा कामगार एकजुटीची गरज निर्माण झाली आहे. आयटक च्या शताब्दी वर्षात त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत.
३१ ऑक्टोबर २०१९ रोजी शताब्दी वर्षाला आयटक ची सुरुवात होत आहे मुंबईत स्थापना दिनाची आठवण
गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी लढाऊ गिरणी कामगार चळवळी च्या ठिकाणी येत्या ३१ आॅक्टोबरला कोतवाल गार्डन, दादर ते रवींद्र नाट्यमंदिर पर्यन्त रॅली काढण्यात येणार आहे. देशातील केंद्रीय कामगार संघटनांचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत व १ आणि २ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कौंसिल ची बैठक राष्ट्रीय मिल मजदूर संघच्या लोअर परेल सभागृहात होणार आहे. वर्षभर कामगार चळवळीचा इतिहास, कामगार चळवळीतील पुढील आव्हाने, असगंटीत कामगार प्रश्न, कंत्राटी कामगार योजना, कर्मचारी प्रश्न, कामगार कायद्यातील बदल, पेन्शन विषयी भूमिका आदी विषयांवर राज्यात विभागवार परिषदा, सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत.
मंदी मुळे रोजगार जात आहेत, रोजगार गेलेल्या कंत्राटी कामगार, निम कामगार, कायम कामगारांना बेरोजगार भत्ता, किमान वेतना इतका राज्य व केंद्र सरकारने त्वरित द्यावा अशी मागणी अमरजित कौर यांनी यावेळी केली. आयटक चे शताब्दी वर्ष कामगार चळवळ एकजूट व कामगार लढ्याचे वर्ष म्हणून केले जाणार असल्याची माहिती कॉम्रेड अमरजित कौर ( राष्ट्रीय महासचिव आयटक) यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय सचिव काॅ.सकुमार दामले, सरचिटणीस कॉ.श्याम काळे, महाराष्ट्र आयटक अध्यक्ष कॉ. सी एन देशमुख, बँक कर्मचारी नेते देविदास तुळजापूरकर, राज्यसचिव राजू देसले, जोती नटराजन, प्रकाश बनसोड, दिलीप पवार, सि बी पाटील, आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा