तालुक्याच्या इतिहासात सर्वात तरुण आणि अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड नक्की होईल यात शंका नाही ! उमेदवारी मागणीची मुलाखत दिल्यानंतर व्यक्त केला विश्वास !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

तुळजापूर विधानसभा
परत एकदा उमेदवारी ची दावेदारी
              तुळजापूर (दि.२६)::- भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी साठी योगेश केदार यांनी मुलाखत दिली. पक्षाच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची माहिती वरिष्ठ पातळीवर पाठवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शेखर चर्हेगावकर यांच्यावर असून पक्षाची ही प्रक्रिया आहे. ती पूर्ण करण्याचे काम केदार यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी विश्वासपूर्वक सांगितले की, वरिष्ठ नेतृत्व आणि पक्षावर माझा विश्वास आहे. तालुक्याच्या इतिहासात सर्वात तरुण आणि अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड नक्की होईल यात शंका नाही.
मी छत्रपतींचा एक मावळा आहे याचा मला अभिमान आहे, त्यानुसार शासनस्तरावर माझ्या संबंधांच्या जोरावर कोणतेही राजकीय पद नसताना मतदार संघाचे विकासासाठी योगदान देत आहे, अनेक योजनांना मंजूरी मिळवून आणली, काही पूर्णत्वास आल्यात तर काही प्रगतीपथावर आहेत, तुळजापूर मतदार संघाचा विकास हा ध्यास उराशी बाळगून मी सतत कार्यरत आहे व राहील असे त्यांनी पक्षाचा उमेदवारी मागणी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !