नावाच्या अध्यक्षपदी सचिन गीते तर सरचिटणीसपदी दिलीप निकम ! जाहिरात संस्थांच्या संघटनेची बिनविरोध निवडणूक पार पडली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नावाच्या अध्यक्षपदी सचिन गीते  तर सरचिटणीसपदी दिलीप निकम
नाशिक- दि .25- येथील जाहिरात संस्थांची संघटना नाशिक ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा )च्या नूतन कार्यकारिणिची निवड करण्यात आली असून , अध्यक्षपदी  श्री   ऍडव्हर्टायझिंगचे संचालक सचिन गीते पाटील  यांची तर सरचिटणीसपदी वत्सदा ऍडव्हर्टायझिंगचे संचालक दिलीप निकम  यांची बिनविरोध  निवड करण्यात आली. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल राजभोज येथे संपन्न झाली. मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली .  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. भाऊसाहेब  गंभीरे  यांनी काम पाहिले. त्यांना संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे व अमोल कुलकर्णी यांनी साह्य केले.  अध्यक्षपदासाठी सचिन गीते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली . त्यावर कोणीही विरोध न दर्शवता गीते यांच्या निवडीला एकमताने  संमती देण्यात आल्याने त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी घोषित केले तर दिलीप निकम यांचे सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले . उपाध्यक्ष पदासाठी श्रीशुभ अँड चे महेश कलंत्री यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली . नूतन अध्यक्ष सचिन गीते यांनी नवीन कार्यकारिणी घोषित केली .
उर्वरित कार्यकारिणीत  खजिनदार  मिलिंद कोल्हे -पाटील , चिटणीस प्रवीण मोरे , कार्याध्यक्ष राजेश शेळके हे पदाधिकारी तर कार्यकारिणी सदस्य म्हणून विठ्ठल राजोळे ,  नितीन राका, रवी पवार , शाम पवार , गणेश नाफडे , दीपक जगताप, सुहास मुंदडा, नितीन शेवाळे , दत्तात्रय वाळूंज यांचा समावेश आहे .
याप्रसंगी अभिजित चांदे, प्रताप पवार , नीतीन राका यांनी जाहिरात व्यवसायातील बदलावर मार्गदर्शन केले . यावेळी  विठ्ठल देशपांडे , संदीप भालेराव , किरण पाटील, अनिल अग्निहोत्री, कैलाश खैरे आदी  नावाचे सदस्य उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !