अल्ट्रा मॉड्यूलर गेम चेंजर मानल्या जाणाऱ्या ट्रायबरचा २८ ऑगस्ट रोजी शुभारंभ ! फक्त ११००० रुपये भरून नोंदणी करता येईल ! नाबाद लवचिकता. रेनो ट्रायबर हा खरा गेम चेंजर असून ते एक आधुनिक, प्रशस्त तरीही आटोपशीर, फारच संक्षिप्त, इंधन-स्नेही वाहन आहे - सीईओ वेंकटरामण मामील्लपले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल !!!!!

रेनो ट्रायबरच्या नोंदणीला १७ ऑगस्टपासून सुरुवात,     
अल्ट्रा मॉड्यूलर गेम चेंजर मानल्या जाणाऱ्या ट्रायबरचा २८ ऑगस्ट रोजी शुभारंभ !
            नवी दिल्ली(प्रतिनिधी)::- रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून, त्यांनी त्यांचे नवीन उत्पादन रेनो ट्रायबरची नोंदणी खुली झाल्याची घोषणा केली आहे. २८ ऑगस्टपासून रेनो ट्रायबरचा बाजारात शुभारंभ होणार आहे. रेनो ट्रायबर ही भारत आणि फ्रान्समधील रेनो संघादरम्यान सामर्थ्य आणि सहकार्याचे प्रदर्शन करते. हे जगातील पहिले वाहन आहे, जे खासकरून भारतीय बाजारपेठेला समोर ठेवून  बनविण्यात आले. चेन्नई येथील निर्मिती सुविधा केंद्रात नवीन कारची निर्मिती याअगोदरच सुरू झाली आहे व देशातील रेनोच्या ३५० हून अधिक विक्रेत्यांकडे, सर्वात मोठ्या संपर्कजाळ्यापर्यंत वाहने लवकरच पोहोचतील. 
रेनो ट्रायबरची नोंदणी १७ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. https://triber.renault.co.in या वेबसाईटवरून किंवा रेनोच्या अधिकृत विक्रेत्याकडे  रु.११०००/- टोकन रक्कम भरून ग्राहकांना रेनो ट्रायबरची नोंदणी करता येत आहे.
“रेनो ग्रुपकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. भारतात विस्तार करण्याच्या उद्देशाने कंपनीचे उद्दिष्ट्य आणि धोरण अगदी स्पष्ट आहे, येत्या तीन वर्षांमध्ये वार्षिक विक्री दुप्पट म्हणजे २०००००( दोन लाख)  युनिटइतकी वाढवण्यावर आमचा भर राहील, रेनो ट्रायबर विस्तार योजनेवर महत्त्वाची भूमिका बजावेल. जागा आणि मॉड्यूलरिटीच्या बाबतीत नवीन मापदंड प्रस्थापित करेल. या विभागात ग्राहक संख्या वाढविण्याच्या दिशेने ट्रायबरचे लक्ष्य असून बी-सेगमेंट अग्रभागी राहील. रेनो ट्रायबरने एखाद्या तज्ज्ञाच्या भूमिकेत शिरून ग्राहकाच्या गरजा जाणून घेतल्या, आपल्या अद्वितीय अभियांत्रिकी क्षमता, सखोल आरेखन तज्ज्ञता आणि बळकट निर्मिती क्षमतांनी सज्ज झाली आहे. रेनो ट्रायबर रेनोचे समकालीन डिझाईन, आधुनिक वैशिष्ट्ये, आधी नव्हती अशी प्रशस्त जागा, मोकळा वावर सोबतच अष्टपैलूत्व उपलब्ध करून देते. बुकिंगला सुरुवात झाली असून रेनोच्या कुटुंबात आणखी ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत,” असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामील्लपले म्हणाले.   
रेनो ट्रायबरचे डिझाईन आकर्षक, दणकट, आटोपशीर (कॉम्पॅक्ट), प्रशस्त आणि संक्षिप्त (मॉड्यूलर) आहे, हे अष्टावधानी वाहन ४ मीटरहून कमी जागेत एक ते सात प्रौढ व्यक्तींचा सहज समावेश करून घेऊ शकते. भारतातील ग्राहकांच्या अपेक्षांचे संपूर्ण विश्लेषण करूनच रेनो ट्रायबरची निर्मिती करण्यात आली आहे, जी देते नाबाद लवचिकता. रेनो ट्रायबर हा खरा गेम चेंजर असून ते एक आधुनिक, प्रशस्त तरीही आटोपशीर, फारच संक्षिप्त, इंधन-स्नेही वाहन आहे. यामध्ये अनेक आकर्षक, आधुनिक आणि व्यावहारिक वैशिष्ट्यांनीयुक्त सुविधा आहेत. रेनो ट्रायबर पाच आसन क्षमता असणाऱ्या वर्गवारीत सर्वाधिक बूट क्षमता राखून आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !