न्यूज मसाला एक्सक्ल्युझिव्ह! आज नवनिर्वाचित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी "त्या" रस्त्याची माहिती घेणार ! १ आॅगस्ट रोजी केला जातेगांवचा दौरा !! प्रशासनाकडून विकासात्मक व प्रशासकीय कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना जनसंपर्काच्या माध्यमातून पोहचविली जाणार- एस. भुवनेश्वरी,मुकाअ,जिप. !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!
नासिक::- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी १ आॅगस्ट रोजी जातेगांव चा दौरा करून आपल्या कार्याच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात केली. सध्या कार्यालयीन कामकाजास व फाईलींचा स्वअभ्यासाबरोबरच निपटारा करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे, लवकरच जिल्ह्यातील पंचायत समित्या व गावांना भेटी देण्याचे व तेथील अडचणी समजून घेत दूर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे न्यूज मसालाशी बोलताना सदर माहिती दिली.
प्रशासनाकडून विकासात्मक व प्रशासकीय कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना मिळावी, यांसाठी जनसंपर्काच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर व जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा या रस्त्याच्या चौकशी ची मागणी केली आहे, सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने की जिल्हा परिषदेने तयार केला आहे ? रस्त्याचे काम करणारे ठेकेदार कोण ?, बील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे की जिल्हा परिषदेकडे सादर केले आहे ? दोन्ही कडे सादर केले आहे ? नक्की रस्त्याचे काम कोणत्या विभागाकडून करण्यात आले आहे ? अशा अनेक प्रशनांबाबत आज दि. ३ रोजी इवद १ च्या कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मी पदभार स्वीकारला तेव्हापासून हा विषय ऐकत आहे मात्र पूर्ण माहिती नसल्याने तत्काळ कार्यवाही करणे उचित नाही, संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई, कार्यवाही वा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा