माणुसकीच्या नात्याने पुरग्रस्तांना मदत – शितल सांगळे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी संघटना यांचेकडून दहा लाख रुपये किंमतीची जीवनावश्यक सामुग्री कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे रवाना !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

               नाशिक  : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलया कोल्हापूर येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी  नाशिक जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी व विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने आज विविध जिवनावश्यक वस्तुंनी भरलेला ट्रक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, बांधकाम सभापती मनिषा पवार, आरोग्य व शिक्षण सभापती यतीन पगार, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर, महिला बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. यामध्ये १० लक्ष रुपयांपर्यतच्या वस्तुंचा समावेश आहे.
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्हयात शहरे व गावे पूरपाण्यामुळे अद्यापपर्यत पूर्णपणे वेढलेली आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा मिळणे दुरापास्त झाले आहे. कोल्हापूर जिल्हयातील प्रशासकीय यंत्रणेने व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मानवतेच्या दृष्टीकोनातून नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी व विविध संवर्गिय कर्मचारी संघटना यांना वस्तु स्वरुपात धानय, व जिवनावश्यक मुलभूत साहित्य दि. १३ ऑगस्टपर्यत जिल्हा परिषदेस जमा करण्याबाबत आवाहन केलेले हेाते. या आवाहनास प्रतिसाद म्हणून ग्रामसेवक संघटना, औषध निर्माण अधिकारी संघटना, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना, नर्सेस संघटना, आरोगय कर्मचारी संघटना, पशु वैद्यकीय अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना यांच्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांनी वैयक्तिक स्वरुपात मोठया प्रमाणात वस्तु जिल्हा परिषदेच्या पूरग्रस्तांसाठीच्या मदतीसाठी जमा केल्या. यात प्राधान्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके यांनी पुढाकार घेवून केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व महिला पदाधिकारी यांच्यासह महिला अधिकारी व कर्मचारी यांनी नवीन वस्तु स्वरुपात महिला व मुलांसाठी आवश्यक असलेले परिधान करावयाचे वस्त्र व ब्लॅकेट, चादरी मोठया प्रमाणात तात्काळ जमा केल्या. मदत वस्तु देण्यात महिला पदाधिकारी शितल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, महिला बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर यांनी प्राधान्याने सहभाग नोंदविला. वस्तु स्वरुपात जमा केलेले साहित्य साधारण दहा लाखांपर्यतचे असून यामध्ये तांदुळ, गव्हाचे पीठ, बेसन पीठ, खाद्यतेल, साबण, शॉल, टॉवेल, बेडशीट, सतरंजी, साडी,बिस्कीट यांच्यासह विविध वस्तुंचा समावेश आहे.
सदरचे साहित्य कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे रवाना करतेवेळी नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, महिला बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर, अर्थ व बांधकाम सभापती मनिषा पवार, आरोग्य व शिक्षण सभापती यतीन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके, स्थायी समिती सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, बाळासाहेब क्षिरसागर, सविता पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, दिपक शिरसाठ, महेंद्र काले, यशवंत शिरसाठ, रमेश बोरसे, निलेश केदार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा वित्त अधिकारी महेश बच्छाव, ग्रामसेवक संघटनेचे कैलास वाघचौरे, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे फय्याज खान, अभियंता संघटनेचे आर.एन.पाटील, कर्मचारी महासंघाचे अरुण आहेर, महेंद्र पवार, पशुवैद्यकीय संघटनेचे डॉ. भगवान पाटील, रत्नाकर पगार, राजेंद्र देसले. जी.पी. खैरनार, रवि थेटे, विक्रम पिंगळे, विलास शिंदे, विजय हळदे आदि उपस्थित होते.
माणुसकीच्या नात्याने पुरग्रस्तांना मदत – शितल सांगळे
              आपत्तीच्या काळात दुसऱ्याला मदत करणे हीच खरी माणुसकी आहे. संकट हे कधीही आणि कोणावरही येऊ शकते. अशावेळी आपण केलेली एक छोटीशी मदतही दुसऱ्याला नवीन जीवन देण्यास सहाय्यकारी ठरू शकत असते. त्यामुळे पूरग्रस्तांना माणुसकीच्या नात्याने मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांसह विविध संघटनांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या सर्व घटकांनी माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे केला असून जवळपास १० लक्ष रुपयांची वस्तुरुपी मदत कोल्हापूर जिल्हयाकडे पाठविण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !