खासदार डॉ भारती पवार यांनी घेतली केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट मंत्र्यांची भेट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

खासदार डॉ.भारती पवार यांनी घेतली केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट मंत्र्यांची भेट !
    प्रतिनिधी::- दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी दि.१ ऑगस्ट रोजी निफाड येथे ड्रायपोर्ट व्हावे या करीता केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट, पोर्ट मंत्री मनसुख मांडवीय यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. भेटी प्रसंगी निफाड येथे ड्रायपोर्ट उभारणी बाबत चर्चा करत असताना ड्रायपोर्ट कसे व्यवहार्य आहे हे खा.डॉ.भारती पवार या पटवून देत शेतकरी हा कृषी व्यवस्थेचा कणा आहे आणि या ड्रायपोर्टमुळे ग्रामीण भागासह शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास अधिक मदत होईल. या संदर्भात अधिक सकारात्मक चर्चा करत मंत्री महोदयांनी आपण देखील या विषयी सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. सदर भेटी प्रसंगी सुरेश बाबा पाटील, केदा आहेर, आ.अनिल कदम, व्यवस्थापकीय संचालक खरे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !