जिल्हा परिषद बांधकाम सभेला अभियंत्यांची अनुपस्थिती...! शेडेकर चिखलफेकीचा परिणाम;सामूहिक रजा अर्ज करून केला निषेध !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
बांधकाम सभेला अभियंत्यांची अनुपस्थिती...
शेडेकर चिखलफेकीचा परिणाम;सामूहिक रजा अर्ज करून केला निषेध

सिंधुदुर्गनगरी:- महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गुरुवारी कणकवली येथे चिखलाच्या पाण्याने घालण्यात आलेले आंघोळ प्रकरण जिल्ह्यातील शाखा अभियंता यांनी गंभीर घेतले आहे. शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद बांधकाम समिती सभेला विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनी अनुपस्थित राहत निषेध व्यक्त केला. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सचिव म्हणून सभेला उपस्थिती लावली. दरम्यान, सर्व अभियंत्यांनी रजेचा अर्ज टाकत घटनेचा निषेध केला आहे.
सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात शुक्रवारी संपन्न झालेल्या या सभेला सदस्य प्रदीप नारकर, राजेश कविटकर, श्रिया सावंत, राजन मुळीक यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी आ नितेश राणे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता शेडेकर यांना कणकवली बाजार पेठेतील रस्ता पाहणी करण्यास बोलावून त्यांना रस्त्यातील चिखलाने आंघोळ घालत सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल निदर्शनास आणून दिले.मात्र, यामुळे सरकारी यंत्रणा दुखावली आहे.विशेषतः शाखा अभियंता संवर्ग दुखावला आहे. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी सामूहिक एक दिवसाचे रजा अर्ज टाकून या घटनेचा निषेध केला आहे.
(आंबा खवणेकर यांजकडून)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा