जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक – जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध संघटनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी अनिल लांडगे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू व्यक्यिमत्वा मुळे जिल्हयासाठी त्यांनी महत्वाचे योगदान दिले असून पदाधिकारी व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना अनिल लांडगे यांनी आजपर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती दिली तसेच जिल्हा परिषदेत काम करताना अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असून अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध नियम तसेच त्यांच्या हक्कांबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना शिक्षण सभापती यतीन पगार यांनी लांडगे हे अभ्यासू अधिकारी असल्याचे सांगत यापुढेही त्यांनी विकासासाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे , विजय हळदे आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या कामाबाबत माहिती देत त्यांच्या आजवरच्या कामाची माहिती देवून त्यांनी विविध पदांवर केलेल्या कामाचा गौरव केला. कार्यक्रमास बांधकाम सभापती मनीषा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र. वि) प्रदीप चौधरी , इशाधिन शेळकंदे, शिक्षण अधिकारी वैशाली झनकर, नितीन बच्छाव, कार्यकारी अधिकारी संजय नरखेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा