भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तलाठ्याला न्यायालयाने ठोठावली शिक्षा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तलाठ्याला न्यायालयाने ठोठावली शिक्षा !!
नासिक::- वाडीवऱ्हे येथील वडीलोपार्जित शेतगट ५३ चे फेरफार रजिस्टर चर्या ६(ड) नोंदीच्या नकला देणेकरीता तत्कालीन तलाठी सुनतीलाल शिवाजी गावीत याने ४००/- रुपये लाचेची मागणी केली होती. सदर रक्कम १३ आॅगस्ट २०१४ ला वाडीवऱ्हे बाजार पटांगणात स्विकारण्यात आली होती, त्यांचा गुन्हा वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते त्याचा निकाल काल मा. जे. पी. झपाटे , जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४ नासिक यांनी निकाल दिला असून कलम ७ प्रमाणे तीन वर्षे कैद व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी ची कैद, तसेच कलम १३(२) प्रमाणे चार वर्षे कैद व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी ची कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे गुन्ह्याचे कामकाज श्रीमती विद्या जाधव यांनी पाहीले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।