योग विद्याधाम यांच्यावतीनेयोग दिनानिमित्त (२१ जून) मोफत सामुहिक योग साधना व रक्तदान शिबीर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
योग विद्याधाम ओंकार नगर नाशिक यांच्यावतीने
योग दिनानिमित्त मोफत ‘ सामुहिक योग साधना’ व ‘रक्तदान शिबीर’
योग दिनानिमित्त मोफत ‘ सामुहिक योग साधना’ व ‘रक्तदान शिबीर’
नाशिक,दि.२० जून :- योगविद्याधाम ओंकार नगर तसेच अत्रेयनंदन सामाजिक संस्था नाशिक यांच्यावतीने (२१ जून) जागतिक योगदिनाचे औचित्य साधून माऊली लॉन्स, कामटवाडे सिडको नाशिक येथे ‘सामुहिक योग साधना’ व ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुलगुरू डॉ.विश्वासराव मंडलिक, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित राहणार आहे. या सामुहिक योग साधना व रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन योग विद्याधामचे नाशिकचे अध्यक्ष मनोहर कानडे, उपाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम पुरी, कार्यवाहक अॅड. अमरजितसिंग गरेवाल, सिडको विभाग अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष संजय जाधव, कार्यवाहक शंकरराव बोराटे, योगशिक्षिका कांचन खाडे यांनी केले आहे.
योग विद्याधाम यांच्यावतीने निरोगी आयुष्यासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार केला जात असून त्यांच्याकडून वर्षभर विविध योग वर्गाचे आयोजन केले जाते. नाशिक शहरात प्रकल्प प्रमुख व सहप्रकल्प प्रमुख यांच्यामाध्यमातून वर्षभर योग वर्गाचे आयोजन करण्यात येत असते. विशेष म्हणजे जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष योग वर्गाचे आयोजन करण्यात येत असते. यंदा देखील नाशिककरांच्या निरोगी आयुष्यासाठी योग विद्याधाम यांच्यावतीने मोफत एकवीस दिवसीय योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक योगदिनाच्या पार्श्वभूमीवर दि.१ जून पासून या वर्गाला सुरुवात करण्यात आली असून जागतिक योगदिनी (२१ जून) या योग वर्गाचा समारोप होत आहे. त्या निमित्ताने योगविद्याधाम ओंकार नगर तसेच अत्रेयनंदन सामाजिक संस्था नाशिक यांच्यावतीने ( २१ जून) जागतिक योगदिनाचे औचित्य साधून माऊली लॉन्स, कामटवाडे सिडको नाशिक येथे सकाळी ६.३० वाजता ‘भव्य सामुहिक योग साधना’ व सकाळी ७ ते १० या वेळत ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा