पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या  संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या सेवेत छावा क्रांतीवीर सेनेकडून पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, रूग्णवाहिका यांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या शुभहस्ते उद्घाटन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

छावा क्रांती वीर सेनेकडून पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय सेवा वारकऱ्यांच्या चरणी रूजू
नाशिक::-छावा क्रांतीविर सेनेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या  संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या सेवेत पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, रूग्णवाहीका , औषधं आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा  आज बुधवार दि.१९ जून रोजी रूजू केली. या सेवेला युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले (खासदार)  यांच्या विशेष प्रेरणेने ही सेवा रूजू केल्याचे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व प्रदेश संघटक नितीन सातपुते यांनी सांगीतले.
            छत्रपतींनी वारकऱ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याला अभय दिले, वारकऱ्यांची सेवा केली त्या अनुषंगाने छत्रपती शिवरायांचे पाईक म्हणून छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने ही सेवा पुरवली जाते. आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर व सहकाऱ्यांचे पथक व सोबत विविध आजारांवरील गोळ्या औषधे आदींचा पुरवठा करून आज नाशिकमध्ये दिंडी सोहळ्याचे स्वागत करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॕ.नरेश  गीते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व वारकऱ्यांसाठी सेवा उपलब्ध करून देण्यात आली त्याच प्रमाणे वारकऱ्यांना  वारी मार्गात  पंढरपूर पर्यंत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाण्याच्या टँकरद्वारे करण्यात येते त्या टँकरचे देखील महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते उद्घाटन करून सेवा शुभारंभ केला. वारकरी परंपरेला, आपल्या सामाजिक कर्तव्याला स्मरून, सेवा अखंडपणे सुरू ठेवण्याचा , जोपासण्याचा, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज तुमच्या कार्याला आशीर्वाद देवो असे डॉ. लहवीतकर, संस्थानचे माजी अध्यक्ष संजय धोंडगे, अध्यक्ष कोल्हे महाराज, अशा मान्यवरांच्या वतीने कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष  करण गायकर,  नितीन सातपुते प्रदेश संघटक , उमेश शिंदे विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष,  संतोष माळोदे प्रदेश उपाध्यक्ष, नवनाथ शिंदे युवा प्रदेश सरचिटणीस, अर्जुन  शिरसाठ जिल्हा संघटक,  किरण बोरसे आयटी प्रदेशाध्यक्ष,  किरण डोखे,  सौ पूजाताई धुमाळ महिला आघाडी प्रदेश संघटक,  शुभम देशमुख जिल्हाध्यक्ष आयटी,  आदी पदाधिकारी वारकरी विविध संघटनांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।