२१ जून-जागतिक योगदिन, योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे--अमृता वसंत बोरसे  (योगशिक्षिका)!! सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून जरूर वाचा व आपल्या स्नेहीजनांच्या माहीतीसाठी लिंक शेअर करा !!!

योग हा शब्द 'युज' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.
         योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.”
        महाभारत आणि भगवत गीतेच्या फार पूर्वी वीस पेक्षा ज्यादा उपनिषदामध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे ‘योग’ असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मुलभूत सूत्रांच्या रुपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योग सूत्रमध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसऱ्याच योग सूत्र मध्ये योगाची व्याख्या
   योगः चित्त-वृत्ती निरोधः “ – योग सूत्र १.२
        अशी करतात. पतंजलींचे लेखन देखील अष्टांग योग साठी आधार बनले आहेत. जैन धर्मातील पांच प्रतिज्ञा आणि बौध्द धर्मातील योगाचाराची बीजे पतंजली योग सूत्रामध्ये आहेत.

"मध्यकालीन युगात हठ योगाचा उदय झाला"
सर्वांसाठी योग ...
           योगाचे एक वैशिष्ट्य हे आहे कि तुम्ही युवक असा कि वयोवृध्द, निरोगी असा कि आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदाई आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो. वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सुक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो.
           योग आपल्यासाठी कधीही नवीन नव्हता. आपण हे सर्व अगदी बालपणापासून करत आलो आहोत, मग ते पाठीचा कणा मजबूत करणारे मार्जारासन असो कि पचनशक्ती वाढवणारे पवनमुक्तासन असो. आपण शिशूंना दिवसभर काही न काही योग क्रिया करताना पाहतो. हरएक व्यक्तीला योगाचे वेगवेगळे महत्व आणि आवश्यकता आहे. योग प्रत्येकाच्या जीवनाची आदर्श दिशा ठरवण्यासाठी सहाय्य करायला दृढ संकल्प आहे.
         प्राणायाम आणि ध्यान ...
प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोश्वसाच्या योग्य तंत्रांचा सराव केल्यास रक्तामधील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगासने हे एकमेकास पूरक आहेत. या दोन योगतत्वांचा मिलाफ झाल्याने शरीर आणि मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्म नियमन प्राप्त होते. प्राणायाम ही ध्यानाच्या गहऱ्या अनुभवाची तयारी असते.
योगाचे दहा महत्वाचे फायदे | 10 Benefits of Yoga. 
        वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.
         योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे दहा फायदे.
      १.सर्व स्तरांवर तंदुरुस्ती | All-round fitness
      २.वजनात घट | Weight loss
      ३.ताण तणावा पासून मुक्ती | Stress relief
      ४.अंर्तयामी शांतता | Inner peace
      ५.रोगप्रतिकारक शक्तीत वाढ | Improved immunity
      ६.सजगतेत वाढ होते | Living with greater awareness
      ७.नाते संबंधात सुधारणा | Better relationships
       ८.उर्जा शक्ती वाढते | Increased energy
       ९.शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते | Better flexibility & posture
       १०.अंतर्ज्ञानात वाढ | Better intuition...
                   शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन.
            स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे 'योगासन' अशी व्याख्या आहे. आपल्याला माहीत असणारी अनेक योगासने 'अवघड' वाटतात. सुरुवातीस योगासने करणे जड जाते. हळूहळू सरावाने आणि शरीर लवचीक झाल्याने ही अवघड दिसणारी आसने 'स्थिर' व 'तणावमुक्त' (सुखाची) होऊ लागतात. असे आदर्श आसन करणे एकदम साधत नाही. काही जणांना काही आसने साधतात, तर इतरांना इतर आसने साधतात. वय व शरीरबांधणीनुसार यात फरक पडतो. लहानपणी शिकल्यास योगासने लवकर येतात. म्हणूनच शाळेपासून योगविद्या शिकवणे आवश्यक आहे.
                           अमृता वसंत बोरसे...
                          (योगशिक्षक,  नाशिक)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।