साथीचे आजारांवर नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीमध्ये एक कोरडा दिवस पाळण्यात यावा-इशादिन शेळकंदे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक – पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सलग दुस-या वर्षी सर्व तालुक्यांमध्ये जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्यात येत असून १६ ते ३० जुन पर्यत चालणा-या या अभियानात आतापर्यत जिल्हयातील पेठ, निफाड, बागलाण व सिन्नर येथे मोठया प्रमाणात जलकुंभांची स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान प्रभावीपणे राबविणेबाबतचे दिले असून याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे.
      ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश  आहे.  गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मुलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या, हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व टी.सी.एल नमुना तपासणी, साथीचे आजार इत्यादी विषय अत्यंत महत्वाचे आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे व उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याने मागील वर्षापासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडीव शाळेमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक तालुकयाला दोन दिवस देण्यात आले असून आतापर्यत पेठ व निफाड तालुकयात अभियान पूर्ण झाले आहे. सिन्नर व बागलाण तालुक्यात आजपासून अभियानास सुरुवात झाली असून १६ ते ३० जुन या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात सदरचे अभियान पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी व  शाळेत वापरात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे रिकाम्या करून त्यातील स्वच्छता करणे व ज्या स्त्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे क्लोरीनेशन आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व जलसुरक्षक यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
    सदरचे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायतींनी सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या  पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर शुद्धीकरण करण्याची तारीख आँईलपेंटने नमूद करावी, तसेच  सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक कोरडा दिवस पाळण्यात यावा, व पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात टी.सी.एल. उपलब्ध राहील यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।