दिंडोरी लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी 22 कोटींच्या रस्ते कामांना तत्वतः मंजुरी---खा.डॉ.भारतीताई पवार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

दिंडोरी लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी 22 कोटींच्या रस्ते कामांना तत्वतः मंजुरी---खा.डॉ.भारतीताई पवार 
नाशिक:  दिंडोरी लोकसभा मतदार संघातील प्रथम महिला खासदार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या डॉ.भारतीताई पवार यांनी मतदार संघाचा विकासासाठी  संपूर्ण मतदार संघातील रस्त्यांची सद्यस्थितीची निवडून आल्यानंतर त्वरित  पाहणी करून तसा अहवाल संबधित विभागाकडून मागवून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेऊन  मतदार संघातील रस्त्याच्या कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार यांनी केली.तर सदर मागणीची त्वरित दखल घेत नामदार पाटिल यांनी ५०५४(३) व ५०५४(४) अंतर्गत सदरच्या कामांना निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. 
खासदार पदावर विराजमान होताच सत्कार समारंभांना फाटा देत दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या गावांना अधिका-यांना सोबत घेऊन दुष्काळी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन दुष्काळावर कशी मात करता येईल यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबधीताना केल्या एवढेच नव्हे तर गेली अनेक दिवसांपासून दिडोंरी मतदार संघातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहता तात्काळ संबंधित विभागाकडून रस्त्यांची सद्यस्थिती अहवाल मागवून आवश्यकतेनुसार तसेच दळणवळणा योग्य नसलेल्या रस्ते कामांसाठी प्रस्ताव मागवत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली. मतदार संघातील विविध विकास कामांसादर्भात खा. पवार यांनी नामदार पाटिल याच्याशी  चर्चा केली असून त्यामध्ये रस्ते सुधारणा, मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, पूल बांधकाम, स्लॅब ड्रेनेज, जलनिःसारण आदी कामांसाठी मंत्री महोदयांनी आपण लवकरच येत्या जून २०१९ च्या अधिवेशनात ५०५४(३) व ५०५४(४) अंतर्गत सदरच्या कामांना मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.
  मतदार संघात नियमित वापरातील रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय असून तालुक्यातील कामगारवर्ग , शेतकरी तसेच दररोज ये-जा करणाऱ्या व्यापारीवर्गाला वाहनांनी दळणवळण करताना अतिशय मोठ्याप्रमाणावर कसरत करावी लागते. त्याअनुषंगाने खा.डॉ.भारती पवार यांनी मतदार संघातील जवळपास ६४ रस्ते कामांसाठी अंदाजे 22 कोटींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांच्या कडे  सादर केला आहे. व त्यास तत्वतः मंजुरी देखील देण्यात आली आहे.
       जून २०१९ च्या अधिवेशनात सदरच्या रस्ते कामांना मंजुरी देणार असल्याचे आश्वासन खा.डॉ.भारती पवार यांना ना.चंद्रकांत  पाटील यांनी दिले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।