शैक्षणिक गुणवत्तेची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे- डॉ.नरेश गिते ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक –: जिल्हयातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून शैक्षणिक गुणवत्तेची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. यापुढे शिक्षण विभागागडे आपले विशेष लक्ष राहणार असून शालेय गुणवत्तेची जबाबदारी प्रत्येक शिक्षकावरच निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले. आरोगय विज्ञान विद्यापीठाजवळील दिल्ली पब्लिक स्कुल येथे प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित 2019-20 या वर्षातील शैक्षणिक नियोजन आराखडयासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. गिते बोलत होते.
डॉ. गिते पुढे म्हणाले की, शिक्षण हा मानवी विकासाठीचा अतिशय महत्वाचा घटक असून यासाठी नियोजनानुसार काम करण्याची गरज आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी तसेच त्यांच्यात कौशल्य विकास.घडवून आणण्यासाठी प्रयत्नक करण्याबरोबरच शाळांची शैक्षणिक परिस्थिती काय आहे याबाबत सर्वेक्षण करून माहिती घेवून नियोजन करणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांनीही गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी काम करणे आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या नियोजनानुसार प्रत्येक शिक्षकाने काम करावे तसेच शालेय स्वच्छता समितीच्या अध्यक्षांनाही शैक्षणिक नियोजनाबाबत माहिती द्यावी असे आदेश त्यांनी यावेळी शिक्षण विभागाला दिले.
या कार्यशाळेत मानव संसाधन मंत्रालय, दिल्ली यांनी निश्चित केलेल्या ७० परफॉमॅन्स ग्रेडींग इंटिकेटर प्राप्त करण्यासाठी तसेच शाळा, केंद्रस्तर, बिटस्तर, तालुका व जिल्हास्तरावर शैक्षणिक व प्रशासकिय सनियंत्रण सुलभ व्हावे यासाठी दोन दिवसी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने निश्चित केलेल्या सर्व ७० निकषांमध्ये नाशिक जिल्हा अव्वल यावा यासाठी शिक्षक, केंद्रप्रमुख,, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या स्तरावर पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी केले. कार्यशाळेस विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयानिहाय तज्ञ शिक्षक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता, विषय सहायक आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन सर्व शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी सुनिल दराडे यांनी केले.
__________________________________________

राज्याच्या स्थितीवर मिळणार अनुदान
शासनाने ठरवून दिलेल्या इंटिकेटरनुसार राज्य ज्या स्थितीत आहे त्यावर राज्याला अनुदान मिळणार आहे. यामध्ये गुणवत्ता व अध्ययन निष्पत्ती, इयत्तानुरुप प्रवेश, भौतिक सुविधा, समता, प्रशासन प्रक्रिया या पाच प्रमुख विषयांचा समावेश असून यामध्ये विविध घटकांचा समावेश आहे. प्रत्येक विषयाला गुण ठरवून देण्यात आले आहेत. या गुणांनुसार शाळेची, जिल्हयाची व राज्याची स्थिती ठरविण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा