नगरसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

ठाणे::- येथील मीरा भाईंदर मनपाचा नगरसेवक कमलेश यशवंत भोईर, वय 50 वर्ष, प्रभाग क्रमांक 15 ड,  मिरा-भाईंदर,  ठाणे. राहणार- हरीदर्शन,  मिरागांव, ता. जि. ठाणे. व गोरखनाथ ठाकूर शर्मा,  वय-48, लेबर काँट्रॅक्टकर, राहणार - रूम नं. 2, कमलेशनगर, मिरागांव, महाजनवाडी, बाबली भाट चाळ, ता. जि. ठाणे या दोघांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम स्वीकारतांना काल सायंकाळी ८ वा. सुमारास ताब्यात घेतले.यातील ४२ वर्षीय तक्रारदार यांचे राहते घराचे पोटमाळ्याचे बांधकाम चालू  असुन, यातील तक्रारदार यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेची परवानगी घेतली नसून, घराचे  पोटमाळ्याचे काम चालू ठेवायचे असल्यास 25,000/- रूपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी करुन, पैसे न दिल्यास महानगरपालीका अधिकारी यांना सांगून तक्रारदार यांचे राहते घराचे चालू असलेले पोटमाळ्याचे बांधकाम पाडून टाकू असे सांगून तडजोडीअंती  पहिला हप्ता म्हणून रू.  10,000/-  लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून, सदर लाचेची रक्कम खाजगी ईसम यांचेकडे देण्यास सांगून,  आरोपीत नं 2 खाजगी ईसम यांनी सदर लाचेची रक्कम  आलोसे यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडून स्विकारली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !