माझ्याविषयी कटकारस्थाने करणाऱ्यांना जेलमध्येधाडल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

माझ्याविषयी  कटकारस्थाने करणाऱ्यांना जेलमध्ये
धाडल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ
नाशिक, दि.२३ एप्रिल :- माझ्यावर आणि समीर भुजबळ वर केलेले आरोप सर्व खोटे असुन त्याबाबतचा तसा अहवाल न्यायालयाकडुन तर येईल. मग त्यानंतर मात्र माझ्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना मी जेल मध्ये धाडल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे झालेल्या जाहीर देत भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
         ते पुढे म्हणाले की,  प्रत्येकजण स्वत:ला विकासपुरुष, कार्यसम्राट म्हणून घेत असतांना सिन्नर तालुक्यात १० वर्षे आमदारकी काळात तुम्ही  स्वतः काय विकास केला असा सवाल करत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचा विकास जर कुणी केला असेल तर  तो फक्त मी आणि  समीर भुजबळ यांच्या निधीतुन विकास केला आहे असे सांगत एक बस स्टँड बांधुन त्याचे गाळे भाड्याने देऊन किंवा विकुन आपली दुकानदारी केलेली नाही. सिन्नरच्या विकासासाठी समीर भुजबळ यांनी निधी उपलब्ध करुन दिला  आहे.  त्यामुळे कुणीही खोटे बोलु नये असे सांगून कोकाटेवर चांगलेच  तोंडसुख घेतले.
           पिंपळगांव येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात नाशिकला आल्यानंतर मला सप्तरंगाचे स्मरण होत आहे असे सांगत या सप्तरंगाचे श्रेय लाटत आहे पण मोदींना माहीत नाही  की सप्तरंगासाठी समीर भुजबळ आणि  मी स्वतः कोट्यावधी रुपयांचा निधी  केंद्र आणि राज्यातुन निधी उपलब्ध करुन दिला आहे. या सप्तरंगाचे श्रेय कुणीही घेऊ शकत नाही आणि  मोदीसाहेब तुम्ही कितीही खोटे बोला पण यावेळी तुमची काही खैर नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
        ते म्हणाले की, मोदींना मी आव्हान करतो की, आपल्या पाच वर्षात  शेतक-यांनी आत्महत्या केल्या नाही, नोटबंदीमुळे नागरीक आनंदीत झाले आहेत शेतक-यांचे पैसे दिले असे मला जाहीर सभेत लेखी स्वरूपात दाखवावे यात जर सत्यता आढळून आली तर मी स्वतः समीर भुजबळ यांची उमेदवारी मागे घेतो असे सांगत सिन्नर तालुक्यातील पाणी प्रश्न, शेतीचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न  आणि रोजगाराचा प्रश्न सोडविण्याची ताकद फक्त आणि फक्त समीर भुजबळच करु शकतात असे ठामपणे सांगितले.
         ज्यांनी माझ्या विरोधात कटकारस्थान करुन माझ्यावर खोटी कारवाई केली यात मी शंभर टक्के निर्दोष आहे. त्याबाबतचा न्यायालयाकडून लवकरच तसा दाखला येईलच त्यानंतर मग मात्र मी माझ्या विरोधात कारस्थान करणा-याना मी जेल मध्ये धाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे