ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचा समीर भुजबळ यांना पाठींबा जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचा समीर भुजबळ यांना पाठींबा जाहीर
नाशिक,दि.२२ एप्रिल :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना ओबीसी एनटीपार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष संजय कोकरे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांची भेट घेऊन आपला पाठींबा जाहीर केला आहे. यावेळी भरत सोनवणे उपस्थित होते, अशी माहिती भुजबळ यांच्या कडून देण्यात आली.
             ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया कडून देण्यात आलेल्या पाठींबा पत्रात  म्हटले आहे की, भारतीय जनगणना आयोग भारत सरकारतर्फे ओ.बी. सी. समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी याचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच नाशिक जिल्ह्याचा सर्वागीण विकासासाठी भटक्या विमुक्त ओबीसी समाजाच प्रतिनिधित्व करणारी संघटना ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया नाशिक लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी पार्टी आघाडीचे उमदेवार समीर भुजबळ यांना जाहीर पाठींबा देत असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडणूक देण्याचा निर्धार करीत आहे.
              ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या संघटना यांनी देखील आपला पाठींबा जाहीर केला असून नाशिक लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विभागात जाऊन समाज बांधवाच्या गाठीभेटी, बैठका घेऊन समीर भुजबळ यांना संसदेत पाठविण्यासाठी रणनीती आखून काम करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे