उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन ! जास्तीतजास्त बटुकांनी सहभाग नोंदवावा-प्रविण तिवारी. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

ब्राह्मण यूनिटीकडून सामुदायिक उपनयन संस्कार सोहऴ्याचे आयोजन !
नासिक::- ब्राह्मण यूनिटी आँर्गनायझेशन संस्थेद्वारे हिंदू धर्मातील सोळा संस्कारातील एक प्रमुख संस्कार म्हणजेच उपनयन संस्कार सोहळ्याचे २१ मे २०१९ रोजी आयोजन करण्यात आले आहे. गोदातीरी सोमेश्वर मंदीराच्या पावनस्थळी श्री भगवान भोलेनाथांच्या सान्निध्यात होणाऱ्या या सोहळ्याला महामंडलेश्वर संवीदानंदजी महाराजांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ब्राह्मण यूनिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण तिवारी यांनी या सोहळ्याला जास्तीत जास्त बटूकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे. बटूकांसोबत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बटूकांना आशिर्वाद द्यावेत असे नम्र निवेदन सुनिता तिवारी, महेश पाठक, अनिल दिक्षीत, गजानन कुलकर्णी, गीता चंद्रस, सीमा पाठक, रविंद्र बडवे, सतिष घैसास, वैष्णवी तिवारी, प्रशांत कुलकर्णी, नूतन गंगोळे, ईश्वरी तिवारी यांनी केले आहे, सदर संस्कार सोहळ्यासाठी बटुकांची संख्या मर्यादित असल्याने पूर्वनोंदणी आवश्यक असून अधिक माहीतीसाठी  ९८५००४५८७९,  ८४२१८४५९७९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
गरजू व गरीब समाजबांधवांसाठी मोफत उपनयन  संस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे