गोडसेंचा एकलहरे गटात झंझावाती प्रचार दौरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

गोडसेंचा एकलहरे गटात झंझावाती प्रचार दौरा !
नाशिकः महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ काल शिवसेना उपनेते बबनराव घोलप, आ. योगेश घोलप, जि.प. सदस्य शंकरराव धनवटे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के आदींच्या नेतृत्वाखाली एकलहरे गटात झंझावाती दौरा करण्यात आला. या प्रचार दौऱ्यात एकलहरे गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या दौऱ्यात सहभागी झालेल्या नेत्यांनी जास्तीत जास्त मतदान करुन टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. ग्रामीण भागातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. सकाळी एकलहरे येथून सुरुवात झालेल्या या प्रचार दौऱ्यात सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, मोहगाव, बाभळेश्वर, बेलतगव्हाण, संसरी, शेवगे दारणा, नानेगाव, दोनवाडे, राहुरी, लहवित , लोहशिंगवे, वंजारवाडी आदी गावांमध्ये प्रचार करताना घोलप यांनी गत पाच वर्षातील गोडसेंच्या कामाचा आलेख सादर करत भागाच्या विकासासाठी युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी अजिंक्य गोडसे, पं.स. सदस्य अनिल जगताप, डॉ. मंगेश सोनवणे, शाखाप्रमुख शांताराम राजोळे, मधुशेठ कापसे, योगेश म्हस्के, सचिन जगताप, लकी ढोकणे, प्रकाश घुगे, आकाश म्हस्के, अशोकशेठ म्हस्के, राजाभाऊ घुगे, कैलास म्हस्के, भास्कर घुगे, पांडुरंग पवार, पांडुरंग धात्रक, निखिल टिळे, सुरेश टिळे, धनाजी टिळे, शिवाजी टिळे, अविनाश टिळे, दिलीप कातोरे, शरद पाळदे, प्रतिभा कातोरे, मोहन पाळदे, रवि दोंदे, देवचंद पाळदे, दिलीप कासार, बाळासाहेब पाळदे, चंद्रकांत कासार, प्रमोद आडके, नवनाथ शिंदे, अशोक शिंदे, भाऊसाहेब चौधरी, संतोष आडके, अशोक आडके, पप्पू शिरोळे, भाऊसाहेब शिरोळे, आत्माराम बोराडे, बाळासाहेब बोराडे, ज्ञानेश्वर पाळदे, संगिता घुगे, निवृत्ती सांगळे, करण घुगे, शिवाजी घोरपडे, रामा सांगळे, मुकुंद पाळदे, शंकर मुठाळ, गजीराम मुठाळ, निवृत्ती मुठाळ, पी.एल. गायकवाड, विष्णुपंत गायकवाड, दशरथ मुठाळ, समाधान कातोरे, आनंदा सामोरे, अशोक कातोरे, छगन पाटोहे, संतोष जुंद्रे, शिवाजी डांगे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे