बिनचेहऱ्याची आघाडी पापं करूनही निर्लज्जपणे सामोरे येते, काॅग्रेसचे घोटाळे सुद्धा आदर्श घोटाळे आहेत-उद्धव ठाकरे ,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिकः  ज्यांनी सत्तर वर्षे देश लुटून खाल्ला, देशातील जनतेला पिळवलं त्या काँग्रेस व राष्ट्रवादीची बिन चेहऱ्याची आघाडी आहे. एवढी पापं करुनही ते पुन्हा निर्लज्जपणाने सामोरे येत आहे. त्यांनी हजारो कोटींचा घोटाळा करुन देशाचा सत्यानाश केला. आम्ही देव, देश व धर्मासाठी एकत्र आलो आहोत. देशाच्या हितासाठी युती केली आहे. ही भगवी वज्रमूठ पक्की असून कोणीही तिला टक्कर देऊ शकणार नाही. इथे इनाम राखणारी माणसं आहेत. एक दिशा आहे एक विचार आहे व एक नेता आहे. काश्मीरमधील ३७० कलम काढणार असून देश द्रोह्यांना फासावर लटकावणार असून आम्ही राममंदीर बांधणारच असल्याचा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
         नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवर हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी , राज्यमंत्री दादा  भुसे, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, शिवसेना जिल्हा संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, भाजपाचे वरीष्ठ पदाधिकारी लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सेनेचे उपनेते बबनराव घोलप, भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ताजी गायकवाड, अजय बोरस्ते, दिनकर पाटील, विनायक पांडे, आ. सिमाताई हिरे, आ. राजाभाऊ वाजे आदी उपस्थित होते.
ठाकरे यांनी राहूल गांधी व शरद पवार, छगन भूजबळ यांच्यावर घणाघाती टीका केली. भुजबळ म्हणतात माझा काही दोष नाही मग अटक का झाली. ज्यांनी १९९२-९३ मध्ये मुंबई वाचवली त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना अटक करण्यासाठी कारस्थान रचले होते. पण जो भगव्याचा द्रोह करतो तो कर्मानेच भोगतो अशी टीका त्यांनी केली. शरद पवार सोनियांना विदेशी आहे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही असे म्हणत होते मग आता का आघाडी केली. ते अतिरेक्यांचे सांत्वन करतात आणि भारत मातेचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांचे मनोबल व त्यांच्या शौर्याचं खच्चीकरण करतात. त्यांचं बकासुराच सरकार  ते काय देश चालवणार आहे असा प्रश्न त्यांनी केला. काॅग्रेसचे घोटाळे सुद्धा "आदर्श" घोटाळे आहेत,  सावरकरांबद्दल वाट्टेल ते बोलतात, मात्र सावरकर हे देशासाठी लढले,  राहूलला देश माहीत नाही. अपक्ष उमेदवार कोकाटे बाजारबुनगे असल्याची टीका त्यांनी नांव नका घेता केली. आपल्याकडे हेमंत आप्पा आहे समोर फक्त गप्पा असल्याचे सांगतांनाच गोडसे यांना भरघोस मतांनी निवडूण द्या असे आवाहन केले.
या प्रसंगी उत्तराखंडचे पर्यटन विकास मंत्री सतपाल महाराज यांनी मोदींनी देशाची शान वाढविली. आतंकवाद कमी करण्यासाठी सेनेला अधिकार दिले अमेरिकेनंतर आपल्याकडे आता अंतरिक्षातही ताकद आहे. देश पुढे जात आहे. हेमंत गोडसे यांनीही चांगली कामे केली असून विकास वाढविण्यासाठी त्यांना मोठ्या मतांनी निवडूण देण्याचे आवाहन केले. नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नाशिकचा विकास करणारे हवे की जेलच्या वाऱ्या करणारे हवे असा प्रश्न करतानाच देशाला मजबूत महासत्ता बनविण्यासाठी हेमंत गोडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी लाहोर व कराचीत सुध्दा राममंदीर बांधू  कारण पाकिस्तान जगाच्या नकाशावरही रहाणार नाही. कारण देशाला मोदींच्या रुपाने खंबीर नेतृत्व लाभले आहे. गुंड-झुंड मातीत गाडायचेअसून उध्दव ठाकरे ठामपणे मोदींच्या पाठिशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास  महायुतीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे