सिडकोतील महिलांनी हेमंत गोडसे यांचे औक्षण करून दिल्या विजयीभव च्या शुभेच्छा !! तरुणांनी काढलेली मोटारसायकल रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

सिडकोतील मोटारसायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
शनिवारी सिडको, अंबड भागात मोटारसायकल प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेले उमेदवार खा.गोडसे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी यांचे औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. या प्रचार रॅलीचा माहोल एवढा उत्साही दिसून आल्याने गोडसे यांना विजयाकडे घेऊन जाणारा ठरणार असून सर्वाधिक मताधिक्य सिडकोतून मिळणार असल्याचा विश्वास आमदार सिमाताई हिरे, सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला.  सकाळी ९ वाजता खा. गोडसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे लावलेल्या मोटारसायकली घेऊन प्रचार रॅली काढली.  सिडको विभागातील शिवाजी चौक, अंबड पोलीस ठाणे, गोविंदनगर, मोरवाडी, अंबड गाव, राणेनगर, पाथर्डी फाटा, खुटवटनगर आदी भागात ही रॅली काढण्यात आली. यावेळी शिवाजी चुंभळे, कल्पनाताई पांडे,  बंटी तिदमे, डी. जी. सुर्यवंशी, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, किरण गामणे, किरण दराडे, कल्पानाताई चुंभळे, मुकेश शहाणे, कावेरी घुगे, पुष्पा आव्हाड, दिलीप दातीर, अलका अहिरे, दीपक दातीर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे