नाशिकरोड विभागात समीर भुजबळ यांच्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिकरोड विभागात समीर भुजबळ यांच्या मोटार सायकल
रॅलीमध्ये महिला, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
नाशिक,दि.२३ एप्रिल :- राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ  यांच्या प्रचारार्थ नाशिकरोड विभागात काढण्यात आलेल्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी शकडो महिला व तरुण आपल्या  मोटार सायकल घेऊन रॅलीमध्ये सहभागी होत समीर भुजबळ यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन करत होते. त्याअगोदर समीर भुजबळ यांनी सकाळी संभाजी स्टेडीयम  सिडको येथील मॉर्निग वॉक साठी आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.
        आज सकाळी नाशिकरोड येथील बिटको चौकातून रॅलीला सुरुवात झाली. पुढे जेलरोड, भीम नगर, गारगोटी बंगला,  कॅनॉल रोड,  पवारवाडी,  भगवती लॉन्स,  पंचक गाव, राजराजेश्वरी चौक,  ढिकले मळा,  शिवाजी नगर,  निरगुडे हॉस्पिटल, सैलानी बाबा,  दसक,  सैलानी बाबा, मारुती मंदिरा जवळून उपनगर नाका,  कॅनॉल रोड टाकीवर,  सिन्नर फाटा,  विष्णू नगर, तसेच  एकलहरा रोड,  गोरेवाडी,  ट्रॅक्शन कॉलनी रोड,  पॉलीटेक्निक रोड,  सिन्नर फाटा, चेहडी भगवा चौक,  निसर्ग लॉन्स,  शिवाजी पुतळा,  आंबडेकर पुतळा,  सत्कार पॉईट,  राजवाडा,  गुलालवाडी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.  यावेळी नाशिकरोड विभागातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे