देशासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही – आदित्य ठाकरे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

देशासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही – आदित्य ठाकरे
नाशिक- दिल्लीत मोदी आणि दुसऱ्या बाजुला ५६ पक्ष एकत्र आले परंतु न खाउंगा ना खाने  दुंगा ही मोदीजींची भूमिका असल्याने देश त्यांच्या पाठिशी आहे. देशात युती पक्की झाली असून  देश वेगाने पुढे जात आहे. देशासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण काँग्रेसने स्वतःची गरिबी हटवली असून देशातील नागरिकांची नाही. नाशिकसाठी खा. गोडसे यांनी खूप कामे केली असल्याने त्यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन  शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
येथील पवननगर येथील राजे संभाजी स्टेडियम येथे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या प्रंसगी व्यासपीठावर  राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, आ. बाळासाहेब सानप ,आमदार सिमाताई हिरे, अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेस असल्याची टीका केली. नाशिक येथे गोडसे यांनी खूप कामे केली असून आयटी, औद्योगिक वसाहत यांना विमानसेवेचा लाभ फायदेशीर ठरणार आहे. विविध कामे मार्गी लावली आहेत. एका बाजुला तुमच्यातला माणूस उभा आहे तर दुसऱ्या बाजुला काँग्रेस व भ्र्ष्टवादी काँग्रेस आहे. त्यांची पापं मिटविण्यातच शासनाची पाच वर्षे गेली आहे.  दुसऱ्या बाजुला ५६ पक्ष एकत्र आली आहेत. त्यांनी भांडणे लावली हे पक्ष देशासाठी काहीही करु शकणार नसल्याने मोदी सोडून दुसरा पर्याय नसल्याचे सांगत महायुती पक्की झाली असून विरोधकांची हिंमत राहिली नाही.
शिवसेना उपनेते, राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेला उद्बोधित करताना प्रारंभीच सन्माननीय व्यासपीठ व चोरुन ऐकणाऱ्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो येथे सेना-भाजपाच्या भरवशावर लोक रहातात. त्यांना देशाचं नेतृत्व ठरवायचं आहे. सेना प्रमुखांचं नाशिकवर व येथील खांदेशी बांधवांचे युतीवर प्रेम आहे. विकासाची कामे करणारा खासदार मिळाल्याने यावेळीस गोडसे २ लाख मतांनी विजयी होतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. तंबू बी, बांबू बी आणि भगवा झेंडा लावू धुमधाम से अशी खात्री त्यांनी व्यक्त करतानाच विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी दिपक दातीर, नानासाहेब पाटील तसेच भाजप -सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे