त्र्यंबकराजाच्या आशिर्वादाने गोडसेंना मिळणार मताधिक्य--पुरुषोत्तम लोहगावकर, जयंत दिंडे यांनी व्यक्त केला विश्वास !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
त्र्यंबकराजाच्या आशिर्वादाने गोडसेंना मिळणार मताधिक्य
पुरुषोत्तम लोहगावकर, जयंत दिंडे यांना विश्वास
नाशिक-खासदार गोडसे यांनी सिहंस्थ काळात सततचा पाठपुरावा करुन केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतून त्र्यंबकेश्वरची अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत त्र्यंबकेश्वर देवस्थानचा समावेश करुन गोडसे यांनी त्र्यंबकराजाची सेवा केली आहे. त्यामुळे त्र्यंबकराजाचे आशिर्वाद गोडसे यांच्या मागे सदैव रहातील व त्यांना त्र्यंबक-इगतपुरी तालुक्यात मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, शिवसेनेचे नेते जयंत दिंडे यांनी व्यक्त केला.
शिवसेना, भाजप, रिपाईं (आठवले गट), रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी काल त्र्यंबकेश्वर तालुक्याचा दौरा केला त्यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील खंबाळे येथून प्रचाराचा नारळ वाढवून या दौऱ्यास प्रारंभ करण्यात आला. या दौऱ्यातील वाढोली, मुळेगाव, अंजनेरी, बेझे, पिंप्री, पिंप्री (मुळाणे), हिरडी, रोहिले, माळेगाव, वाघेरा, गोरठाण, वेळुंजे, अंबोली, शिरसगाव, सापगाव, पिंपळद, तळवाडे आदी गावांमध्ये गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ठिकठिकाणी झालेल्या चौकसभेत ग्रामीण भागातील उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमास माजी आमदार शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, दिनकर पाटील, पप्पू शेलार, अरुण शिंदे, भूषण अडसरे,समाधान बोडके, भावडू बोडके, अशोक उघडे, शिवाजी कसबे, नितीन तांबे आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा