शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारार्थ रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सातपूर,गंगापूर येथे भव्य रॅली
नाशिक- शिवसेना-भाजप व रिपाई, रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या सातपूर, गंगापूर भागातील प्रचार रॅलीस मोठा प्रतिसाद लाभला. सकाळी सातपूर येथील भाजी मंडई येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून प्रचार रॅलीस प्रारंभ करण्यात आला. महायुतीच्या नेत्यांच्या नावाने केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या रॅलीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. खा. गोडसे यांना सुहासिनींनी औक्षण करुन विजयाचा आशिर्वाद दिला.
सकाळी सातपूर येथून निघालेली महारॅली सातपूर गाव, सातपूर कॉलनी, शिवाजी नगर, अशोकनगर, श्रमिकनगर, गंगापूर, आनंदवल्ली आदी भागात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. या रॅलीस नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. महारॅलीच्या अग्रभागी उमेदवार गोडसे यांच्यासह गटनेते दिनकर पाटील,आमदार सिमाताई हिरे, नगरसेवक शिवाजी चुंभळे, शशी जाधव, विलास शिंदे, नयना गांगुर्डे, रवींद्र धिवरे, वर्षा भालेराव आदींसह नगरसेवक, शिवसेना, भाजप, रासप, रिपाई व शिवसंग्राम पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सातपूर येथून प्रारंभ झालेल्या रॅलीचा समारोप गंगापूर रोडवरील जायंट सर्कलजवळ दुपारनंतर समारोप करण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा