शांतीगिरी महाराजांच्या जय बाबाजी परिवाराचा गोडसे यांना जाहीर पाठिंबा ! मतदार संघात लाखांच्यावर भक्तपरिवार ठरणार निर्णायक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

शांतीगिरी महाराजांच्या जय बाबाजी परिवाराचा गोडसे यांना जाहीर पाठिंबा !  
नाशिक- लोकसभा मतदार संघात लाखाहून अधिक भक्तगण असलेल्या प. पू. महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या जय बाबाजी परिवाराने आज महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना एकमुख जाहीर पाठिंबा दिला आहे. शांतिगिरी महाराज कुणाला पाठिंबा देतात याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लागले होते. निवडून आल्यावर पंतप्रधानपदासाठी आणि देश कल्याणासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा द्यायचा या अटीवर जय बाबाजी परिवाराने गोडसे यांना थेट पाठिंबा जाहीर केला. बाबाजी परिवाराने गोडसे यांना पाठिंबा दिल्याने गोडसेंचे विजयाचे पारडे जड झाल्याची चर्चा राजकीय गोटात झडत आहे. रामनवमीच्या पवित्र दिवशीच बाबांचा पाठिंबापर आशिर्वाद मिळाल्याने माझा विजय आजच निश्चित झाल्याचा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे.
          प.पू. शांतीगिरी महाराज यांचे औरंगाबादसह उत्तर महाराष्ट्रात मोठा भक्त परिवार आहे. केवळ नाशिक लोकसभा मतदार संघात लाखाच्यावर जय बाबाजी परिवाराचे भक्तगण आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात जयबाबाजी परिवाराची भूमिका अतिशय निर्णायक असते. शांतीगिरी महाराज कुणाला पाठिंबा देतात याकडे गेल्या महिना भरापासून सर्वच पक्षांच्या राजकीय विश्लेषकांचे  लक्ष लागून होते. महाआघाडीचे समीर भूजबळ, भाजपाचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे, महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यापैकी बाबाजी कुणाला आशिर्वाद देतात याची चर्चा सर्वत्र झडत होती. अशातच काल जय बाबाजी परिवाराच्या राजकीय कमिटीने खासदार गोडसे यांना बोलावत त्यांच्याशी सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. बाबांच्या राजकीय कमिटीने गोडसे यांच्याशी झालेल्या चर्चेचा अहवाल शांतिगिरी महाराज यांना दिला. खा. गोडसे यांचे स्वच्छ चारित्र, हिंन्दुत्वाची कास तसेच समाजकारणासह लोकसेवेची असलेली तळमळ याचा विचार करीत शांतीगिरी महाराजांनी गोडसे यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
आज सकाळी ओझर शिवारातील शांतिगिरी महाराज यांच्या आश्रमात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बाबाजी परिवाराच्या राजकीय कमेटीने गोडसे यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली. यावेळी राजेंद्र पवार, राजाराम पानगव्हाणे, रामानंदजी महाराज, दिपक मेदडे, साहेबराव आगळे, भुसे मामा, हृदयनाथ माउली, राजूभाऊ इंगोले, रवी भोईर, काकासाहेब गोरे, आंबादास आगळे, पैठणकर ताई आदींसह जय बाबाजी परिवाराचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा या जनजागृती अभियानांर्तगत आम्ही नाशिक लोकसभा मतदार संघासाठी भाजप-सेना युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट करत आगामी निवडणुकीत गोडसे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन रामानंद महाराज व राजेंद्र पवार यांनी केले आहे. पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी खा. गोडसे यांना शांतिगिरी महाराज यांनी विजयी भवः म्हणत खास आशिर्वाद दिला. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, रामनवमीसारख्या पवित्र दिवशी मला जय बाबाजी परिवाराने पाठिंबा देत माझ्या विजयासाठी शुभकामना दिल्या. त्यामुळे आजच माझ्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याची भावना गोडसे यांनी व्यक्त केली.
नाशिक शहरात गोडसे यांना मोठा प्रतिसाद
नाशिक- लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महाआघाडीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या झंझावाती दौऱ्यानंतर शनिवारपासून शहरातील प्रचार दौऱ्यास प्रारंभ करण्यात आला आहे. नाशिक शहरात जोरदार प्रतिसाद लाभला. दरम्यान, जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरी महाराज यांनी भक्त परिवारासह गोडसे यांना पाठिंबा जाहीर केल्याने प्रचार कार्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला.
सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नगरिकांच्या मोठ्या प्रतिसादानंतर शहरातही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून नागरिकांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचार दौऱ्यात सहभागी झालेल्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. सेना-भाजपाच्या गोटात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. पंचवटी येथून या प्रचार दौऱ्यास प्रारंभ करण्यात आला. पंचवटी परिसर, गोदावरी गंगाघाट, कपालेश्वर मंदीर व मखलाबाद भागात मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. प्रचार दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी चौकसभा, मतदरांच्या गाठिभेटी यांच्यावर भर देण्यात आला होता. आमदार बाळासाहेब सानप, शिवसेनेचे महानगर प्रमुख महेश बडवे, नगरसेवक  सुनीता पिंगळे, पुंडलीक खोडे, भाजपाचे चंद्रशेखर पंचाक्षरी, शैलेश सूर्यवंशी, निलेश मोरे, जगदीश गोडसे, अमित घुगे, दिगंबर धुमाळ, सुनील निरगुडे, विष्णू गोडसे, प्रसाद सानप आदींसह सेना-भाजपाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे