निवडणूक कर्मचाऱ्यास तत्काळ आरोग्य केंद्रात दाखल करून केले उपचार !! मतदान केंद्रांवरील आरोग्य सुविधेचा डॉ. नरेश गिते यांनी दिवसभर घेतला आढावा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक –लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या सर्व मतदान केंद्रांमध्ये आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्गत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मोहगाव ता नाशिक येथील बुथवरील कर्मचारी श्री. मावळे यांना किडणीस्टोन चा त्रास झाले कारणाने त्यांना तातडीने शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून उपचार करण्यात आले. उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून सर्व आरोग्य यंत्रणा सूसज्ज ठेवण्यात आली होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सुविधा पुरविण्याचे तसेच तालुका व इतर ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आदी कर्मचारी सकाळपासूनच मतदान केंद्रात उपस्थित होते. प्रत्येक केंद्रात आरोग्य विभागाने स्टॉल लावला होता. यामध्ये विविध प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती. उष्माघाता बाबत मतदारांना माहिती देण्यात येत होती.आरोग्य विभागाच्या वतीने ॲम्बुलन्स सेवाही तयार ठेवण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते सकाळपासून आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत होते.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिव्यांग मतदारांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्हीलचेअर वरून मतदान केंद्रावर नेण्यासाठी मदतकरण्यात येत होती.दरम्यान,
मोहगाव ता. नाशिक येथील बुथवरील कर्मचारी श्री. मावळे यांना किडणीस्टोन चा त्रास झाले कारणाने त्यांना शिंदे येथे आणून उपचार करण्यात आले. यावेळी प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ घिगे, डॉ. वळवी, ग्रामसेवक विजयराज जाधव आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा