गोडसे यांना समस्त बोहरी समाजाने दिला विजयाच्या शुभेच्छांसह आशिर्वाद ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

गोडसे यांना समस्त बोहरी समाजाने दिल्या विजयाच्या शुभेच्छा !
          नाशिक- लोकसभा निवडणुकीतील प्रचारात चांगलीच रंगत वाढली असून शिवसेना-भाजप व रिपाई, रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना विविध स्तरातून वाढणाऱ्या पाठिंब्यामुळे विरोधकांची डोकेदुःखी वाढू लागली आहे. मंगळवारी सकाळी येथील बोहरी व वाल्मिकी समाजातील मान्यवरांच्या गोडसे यांनी भेटी घेतल्या. यापूर्वी विविध समाज-संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास समाजाच्या नेत्यांनी भेटीदरम्यान व्यक्त केला.
         येथील बोहरी समाज संघटनेच्या बारुल इमारत येथे गोडसे यांना विजयीभवच्या शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उमेदवार गोडसे यांना समाजाचे धर्मगुरु मुस्ताली भाईसाहेब यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वस्तरातून गोडसे यांना मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे या निवडणुकीत आपले पारडे जड ठरेल असा विश्वास समाजाच्यावतीने व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार देवयानी फरांदे, प्रथमेश विसे, चंद्रकांत थोरात यांच्यासह बोहरी समाजाचे नेते मुस्ताफा भाई हसनजी, अजिम सय्यद बुदउद्दीन जमाली, शब्बीर काचवाला, अमित नुराली, शेख हकीम उद्दीम जमाली, शब्बीर बुरहानी,  अब्बासभाई इझी, मुर्तुजाभाई मर्चंट, शबीबा भारनल, हुसेन भारनल, शेख शब्बीर दिकागर, हुनेश  दिलावर, मुर्तुजा काचवाला, मोहम्मद पंजाब, युसूफ पंजाब, शब्बीर मर्चंट, हसीम काचवाला,जैबुद्दीन अख्तर आदींसह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे