गोडसें यांना आर्य सोमवंशी समाजाचा जाहीर पाठिंबा!                मोटारसायकल रॅली ठरले नाशिकमधले आकर्षण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

         गोडसें यांना आर्य सोमवंशी समाजाचा जाहीर पाठिंबा
                मोटारसायकल रॅली ठरले नाशिकमधले आकर्षण
नाशिक- लोकसभा निवडणुकीतील सेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ  गुरुवारी सकाळी काढण्यात आलेली मोटारसायकल  रॅली शहरातील चर्चेचा विषय ठरली. झेंडे-पताका, भगव्या  टोप्या व उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते सहभागी झाल्याने या भागातील अवघे वातावरण भगवेमय झाले होते. ठिकठिकाणी या रॅलीचे उत्साहात स्वागत करण्यात येत होते.  दरम्यान, या रॅलीच्या प्रारंभीच आर्य क्षत्रिय सोमवंशी समाजाच्यावतीने  उमेदवार हेमंत गोडसे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आल्याचे समाजाच्यावतीने घोषीत करण्यात आले.  त्यामुळे सकाळीसच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढीस लागला.
शिवसेना, भाजप, आरपीआय (आ.) रासप व शिवसंग्राम या महायुतीच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॉलीस मिळालेल्या नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. तरुण बाईकस्वार कार्यकर्त्यांच्या गर्दीने व भगव्या रंगाच्या झेंड्यांनी रॅलीत चांगलाच रंग भरला होता. सकाळी आर्य क्षत्रिय सोमवंशी मंगल कर्यालयापासून  मोटारसायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आला. चित्रमंदीर सिनेमा, रविवार कारंजा बोहोरपट्टी, सराफ बाजार, सरस्वती नाला, गोडगे महराज पुतळा, ठाकरे रोड, पिंपळचौक, त्र्यंबक दरवाजा, भद्रकाली मार्केट, तांबटलेन, नेहरु चौक, सोमवार पेठ, गुलालवाडी, कमोद गल्ली, काझीपुरा, बुधवार पेठ,कथडा, शिवाजी चौक, भोईगल्ली, बागवापुरा, राजवाडा, चौक मंडई कोकणी पुरा दुधबाजार, गंजमाळमार्गे भाजपा कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत तरुणांनी भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, गळ्यात त्याच रंगाची उपरणे धारण केले होते. या रॅलीत तरुण कार्यकर्त्यांसह सेना-भाजपाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
        गोडसे यांना नाशिक शहरासह लोकसभा मतदारसंघात मिळणारा वाढता प्रतिसाद पहाता गोडसे यांचा विजय नक्की मानला जात आहे त्यामुळे प्रभावीत होऊन आर्य सोमवंशी समाजाने विजयी होणारा उमेदवार म्हणून गोडसे यांना पाठिंबा देण्यात आल्याचे समाजाच्यावतीने सांगण्यात आले. या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष सौ. विजयाताई कंकरेज,चंद्रकांत पहिलवान, कृष्णा कंकरेज, श्रीकांत क्षत्रिय, सतिष बिल्लाडे, सुधीर क्षत्रिय,  उज्वल टाक, अरुण कट्यारे, सचिन क्षत्रिय, चेतन खानापुरे, सुधीर क्षत्रिय, प्रशांत पवार, प्रशांत कोकणे, कैलास कुक्कर, डॉ. शिल्पा कुक्कर आदींसह समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे