नाशिक येथे आज निलमताई गोऱ्हे, नितीन बानगुडे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सभा ! मराठा समाज, नोटप्रेस युनियन व बेलदार समाजाचा हेमंत गोडसे यांना पाठिंबा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

     नाशिक येथे आज निलमताई गोऱ्हे, नितीन बानगुडे यांच्या सभा
नाशिक- लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा, आरपीआय, रासपा व शिवसंग्राम या महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ उद्या बुधवार दि. १७ एप्रिल रोजी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक, नाशिकरोड व सातपूर येथे महिला नेत्या निलमताई गोऱ्हे व शिव चरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.
नाशिक येथील गंगापूर रोड वरील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी चार वाजता निलमताई गोऱ्हे महिला मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा सातपूर येथील अशोकनगर, पोलीस चौकीजवळ सायंकाळी पाच वाजता तर नाशिकरोड येथील जेलरोड भागातील गणेश व्यायामशाळेजवळ त्रिमुर्ती चौक येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास  शिवसेना उपनेते बबनराव घोलप, भाजपाचे लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गिते, आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापौर रंजनाताई भानसी, भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, रासपाचे जिल्हाध्यक्ष अरुण आव्हाड, आ. सिमाताई हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. योगेश घोलप, शिवसेना महानगर प्रमुख सचिन मराठे, महेश बडवे आदी  मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या दोन्हीही सभांना महायुतीचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन महायुतीच्या कोअर कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.   ............................................................................................................................................................................
  मराठा समाज, नोटप्रेस युनियन व बेलदार समाजाचा पाठिंबा
      नाशिक- निवडणुकीत प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यासह नाशिक शहरातून गोडसे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध स्तरातून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरु लागली आहे. जय बाबाजी भक्त परिवार, सिक्युरिटी प्रेस युनियन व मराठा संघटनांच्या पाठोपाठ बेलदार क्रांती सेनेने गोडसे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
      दोन दिवसांपूर्वी जिल्हाभर मोठे जाळे असलेल्या जय बाबाजी परिवाराने गोडसे यांना जाहीर पाठिबां दिलाहोता. त्या पाठोपाठ काल मराठा समाजाने व इंडियन सिक्युरीटी प्रेस युनियनने गोडसे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. आज नाशिक जिल्हा बेलदार क्रांती सेनेच्यावतीने खा. हेमंत गोडसे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आल्याची घोषणा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहिदास चव्हाण यांनी दिली. क्रांतीसेनेच्यावतीने उमेदवार गोडसे यांची भेट घेऊन या निवडणुकीत आपणच विजयी व्हावे म्हणून आम्ही आपल्याला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले
    देशात मोदी सरकारने गरिबांसाठी चांगले निर्णय घेतले असून नाशिक जिल्ह्यातही गोडसे यांनी विविध विकास कामे केली आहेत. या उभय नेत्यांच्या चांगल्या कामांमुळे आम्ही प्रभावीत होऊन गोडसे यांना पाठिंबा देत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. या प्रसंगी बेलदार क्रांती सेनेचे पदाधिकारी सुभाष पवार, रामकृष्ण साळुंके, अर्जुन मोहिते, सुखदेव मोहिते, योगेश पवार, रामदास साळुंके, कैलास साळुंके ज्ञानेश्वर साळुंके, रामेश्वर साळुंके, राजेंद्र साळुंके, बाळासाहेब साळुंके, माऊली पथवे, रामनाथ बर्डे, केरु पिंपळे, विजय पिंपळे, अशोकराव माळी, शेळके आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नाशिकरोड येथील प्रतिभूती मुद्रणालयातील प्रेस युनियन संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आल्याचे जनलर सेक्रेटरी जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंदरे, वसंत सांगळे यांनी पत्र दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे