भारतीय कामगार पक्षाचा महाआघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक, दिंडोरी, धुळे लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या
उमेदवारांना भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा पाठींबा जाहीर
नाशिक,दि.१५ एप्रिल :- भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या आघाडीचे नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ, दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले आणि धुळ्याचे उमेदवार कुणाल पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे.
भारतीय शेतकरी कामगार संघटनेचे ज्येष्ठ नेते केरू पाटील हगवणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पक्षाचा मेळावा पार पडला. गेल्या पाच वर्षात शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्ग, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांच्याबाबत युती सरकारने योग्य धोरण निश्चित न केल्याने या सर्व घटकांतील नागरिक अडचणीत आले असून युती सरकारबाबत त्यांच्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. केवळ घोषणाबाजी आणि सर्व सामान्य नागरिकांना झुलवून ठेवल्याने शेती व्यवसायाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. त्याचप्रमाणे वाढती बेरोजगारी, ठप्प झालेला विकास यांचा गांभीर्याने विचार करून युती सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार संघटनेकडून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या आघाडीचे नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ, दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले आणि धुळ्याचे उमेदवार कुणाल पाटील यांना पाठींबा देण्याबाबत एकमताने ठराव करून त्यांना पाठींबा जाहीर केला. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे विविध आघाड्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे