काळारामाच्या दर्शनाने गोडसेंचा शहर दौऱ्यास प्रारंभ !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
काळारामाच्या दर्शनाने गोडसेंच्या शहर दौऱ्यास प्रारंभ
नाशिक- लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महाआघाडीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या ग्रामीण भागातील झंझावाती दौऱ्यानंतर आजपासून शहरात प्रचार दौरा सुरु झाला. गोडसे यांनी येथील ग्रामदैवत असलेल्या प्रसिध्द काळाराम मंदिरात विधीवत पूजा केली. यावेळच्या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळावे यासीठी त्यांनी श्रीरामाला साकडे घातले. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी मंदीर परिसरात श्रीरामाचा जयघोष केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरी रंगत आणली !
सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नगरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आजपासून गोडसे यांनी शहर प्रचार दौऱ्यास प्रारंभ केला. प्रचार दौऱ्यात नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचारा दरम्यान मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. काळाराम मंदिरापासून सुरु झालेला प्रचारदौरा पुढे पंचवटी परिसर, गोदावरी गंगाघाट, मखलाबाद आदी भागात नेण्यात आला. या दरम्यान खा. गोडसे यांनी मोठ्या प्रमाणावर गाठीभेटी घेत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. यावेळी प्रचार दौऱ्यात आमदार बाळासाहेब सानप, शिवसेनेचे महानगर प्रमुख महेश बडवे, नगरसेवक सुनीता पिंगळे, पुंडलीक खोडे, भाजपाचे चंद्रशेखर पंचाक्षरी, शैलेश सूर्यवंशी, निलेश मोरे, जगदीश गोडसे, अमित घुगे, दिगंबर धुमाळ, सुनील निरगुडे, विष्णू गोडसे, प्रसाद सानप आदींसह सेना-भाजपाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा