शिवाजी चुंबळेंची उद्धव ठाकरेंना ग्वाही ! गोडसेंना विजयी करूनच मातोश्रीवर पाय ठेवेन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

गोडसे यांना विजयी करूनच मातोश्रीवर पाय ठेवेल ! उमेदवारीच्या स्पर्धेतील चुंबळे यांची उद्धव ठाकरे यांना ग्वाही !!
नाशिक - लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले जेष्ठ नगरसेवक शिवाजी चुंबळे यांनी एकत्रितपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.साहेब काळजी करू नका,मला जरी तिकीट नाही मिळाले तरी मी गोडसे यांच्या पाठीशी भक्कम पणे उभा आहे.गोडसे यांना विजयी करूनच पुन्हा मातोश्रीवर पाय ठेवील अशी ग्वाही आज चुंबळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. गोडसे आणि चुंबळे यांनी एकत्रितपणे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.
       आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्यालाच पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे जिल्हाप्रमुख विजय करंजकर,शिवाजी चुंबळे प्रयत्नशील होते. उमेदवारीसाठी गोडसे,करंजकर आणि चुंबळे यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा सुरू होती.त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी नेमकी कुणाला मिळते याकडे अवघ्या जिल्हावासियांचे लक्ष लागले होते.जिल्ह्याच्या विकासासाठी गोडसे यांनी आणलेल्या विविध विकास योजनांचा निकष लावत काल अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली.त्यामुळे शिवाजी चुंबळे आता गोडसे यांच्या विजयामागे उभे राहणार की नाही असा सभ्रंम शिवसैनिकांच्या मनात निर्माण झाला होता. शिवसैनिकांच्या मनातील संभ्रमाचे वातावरण दूर होवून उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी शिवाजी चुंबळे यांनी पुढाकार घेतला.गोडसे यांना सोबत घेत एकत्रितपणे उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. हेमंत गोडसेंमुळे जिल्हयात अनेक विकासकामे झाली.दिल्ली दरबारी पाठपुरावा करून जिल्हयाचा विकास साधला. एक स्वच्छ प्रतिमा अशी गोडसे यांची सर्वत्र ओळख आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने गोडसेंच्या पाठीशी उभे आहोत. काळजी करू नका, गोडसेंना पुन्हा खासदार म्हणून निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही  चुंबळे यांनी उध्दव ठाकरे यांच्या भेटीत  दिली. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर,जगदीश गोडसे, जगन आगळे, दिलीप दातीर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल