गुढीपाडव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन ! मतदान, पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेतून मतदान , पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती अत्रेयनंदन बहुद्देशीय कला , क्रीडा , सांस्कृतिक व सामाजिक संस्थेकडून गुढीपाडव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन नाशिक , दि.२९ मार्च :- अत्रेयनंदन बहुद्देशीय कला, क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक संस्था कामटवाडे व नववर्ष स्वागत यात्रा समिती नवीन नाशिक यांच्यावतीने गुढीपाडव्या निमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या वर्षी १०० टक्के मतदान, पाणी बचत, एकात्मिकता याबाबत चित्ररथ तयार करून जनजागृतीकरून नववर्षाचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा प्रा. वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, कोषाध्यक्ष योगेश मांडे,सचिव राजेश मालपुरे यांनी दिली आहे. नवीन नाशिक परिसरात तीन वर्षापासून गुडीपाडव्या निमित्त सर्व समाजाचे संघटन व समाज प्रबोधन तसेच नवीन नाशिक परिसरात सांस्कृतिक अभिसरण व्हावे