अरे फोन का उचलत नाही ? हिम्मत होत नाही काय ? असं काय घडलंय काल ? सविस्तर वाचून दोन मिनिटे शांत राहून सर्वांनी थोडा राग व्यक्त करायलाच हवा !!!

कुण्या देशभक्ताने लिहिलेल्या चार ओळी
जशाच्या तशा !
आपला देश आज सुतकात आहे.
४२जवान शहीद....
...
पहाटे झोपेत असताना ,
काशमीरात तैनात असलेल्या 'मराठा लाईट इन्फन्टरी'तल्या एका मित्राचा फोन येतो...... 20 तास ड्युटी करून त्याचा आवाज कमालीचा थकलेला दबलेला असतो...  माझा जीव कातरून जातो...
.
तो म्हणतो- सच्या घरी फोन कर रं माझ्या
---बायको -दोन बारकी लेकरं -कुणीच कशी फोन उचलनायती..??. आता ड्युटी संपली माझी- पहाटेपासणं फोन करतोय... फक्त रिंग येतीय..
.
.
मी पुण्यावरनं त्याच्या घरी फोन करतो...
पण 12-13 वेळात एकदाही फोन उचलला जात नाही... काळजी वाटायला लागते........
.
.
मग गावाकडच्या एका मित्राला फोन करून  त्याच्या घरी जाऊन यायला सांगतो... अंधारात चाचपडत तो त्याच्या घरी पोचतो..
कित्येक वेळा बेल वाजवूनही दार उघडलं जात नाही...
.
.
परत मी त्याच्या घरी फोन करतो...
8 व्या वेळेला यावेळी फोन उचलला जातो, पलीकडून वाहिनीचा घाबरलेला
-(कधीपासून) रडत असलेला आवाज येतो...
.
थोडासा चिडलेला मी विचारतो --फोन का उचलत नव्हता वहिनी ??
.
.
वाहिनी रडायला लागतात... जोरात!
बांध फोडतात... कानात रडायचा जोरात अन विचित्र आवाज घुमायला लागतो..,
ते ऐकून, त्यांचा झालेला अवतार -मला डोळ्यासमोर स्पष्ट, स्पष्ट दिसायला लागतो... तोंडा नाकातून गळत असलेली त्यांची लाळ -माझ्या 250 किलोमीटर दूर असलेल्या हातावर पडायला लागते...ओघळायला लागते..!
.
शेवटी रडत-रडत त्या एवढंच म्हणू शकतात...
.
.
.
.
.
.
फोन उचलायला भीती वाटतेय हो भैय्या आता... जीव फाटत चाल लाय हळूहळू माझा
......
मित्र मैत्रिणींनो...
तुम्ही आता जेवत असाल, सहज दिवसभराच्या बातम्या पहात असाल, किंवा आजचा दिवस हसत साजरा करत असाल, आई वडिलांशी निवांत गप्पा मारत असाल, आपल्या पोरांसोबत खेळत असाल, किंवा उद्या परवा पिच्चरला जायचा प्लॅन करत असाल... चांगलंच आहे ते.. नक्कीच...
माझी काहीच हरकत नाही...
फक्त एवढंच सांगायचं होतं की
.
.
.
...त्या आज काशमीरात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या घरची परिस्थिती आज या घडीला ही अशी आहे......
अशे दोन हजार पाचशे सत्तेचाळीस सैनिकांच्या घरचे फोन सध्या जोरर,जोरात खणखणतायत.....
पण ते उचलायची हिम्मत .................
व्यर्थ ना हो बलिदान!!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल